Arrest Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 'तुमच्यासाठी पार्सल आहे' म्हणून बाहेर बोलावले, साखळी हिसकावून पळाला; गुजरातच्या कुख्यात चोरट्याला अटक

Porvorim Theft: पर्वरी येथील पीडीए कॉलनीत महिला रहिवाशाची सोनसाखळी लांबवणाऱ्या एका कुख्यात आंतरराज्यीय साखळी चोरट्याला पर्वरी पोलिसांनी अटक केली आहे.

Sameer Panditrao

पणजी: पर्वरी येथील पीडीए कॉलनीत महिला रहिवाशाची सोनसाखळी लांबवणाऱ्या एका कुख्यात आंतरराज्यीय साखळी चोरट्याला पर्वरी पोलिसांनी अटक केली आहे. किशोरभाई मच्छी ऊर्फ रणपरिया हसमुखभाई (वय ४४, रा. विजलपोर, नवसारी, गुजरात) या संशयित आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली आहे.

संशयित आरोपी २०१५ पासून गुजरात व राजस्थानमध्ये अनेक गुन्ह्यांमध्ये सामील असून २०२३ मध्ये कोटा (राजस्थान) येथे त्याला अटक झाली होती. याशिवाय, जून २०२५ मध्ये साळगाव येथेही त्याने अशीच सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

संध्याकाळच्या सुमारास अनोळखी व्यक्ती घरासमोर उभा राहून आपल्या दुचाकीवरूनच त्यांनी आपण डिलिव्हरी एजंट असल्याचे सांगितले. दरम्यान या अनोळखी व्यक्तीने "तुमच्यासाठी पार्सल आहे" असे सांगत मला बाहेर बोलावले आणि मी बाहेर येताच त्या व्यक्तीने गळ्यातील १,८०,००० किंमतीची सोनसाखळी हिसकावून पलायन केले असेही तक्रारीत नमूद करण्यात आले.

संशयिताकडून दुचाकी जप्त!

तत्काळ तक्रार दाखल होताच पर्वरी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. तपासादरम्यान, आरोपी कळंगुट येथील एका गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले असता पोलिसांनी तेथे धाड टाकून त्याला अटक केली.

चोरीच्या वेळी वापरण्यात आलेली दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी चोरीस गेलेल्या सोनसाखळीबाबत काही महत्त्वाचे धागेदोरे मिळवले असून, ती साखळी पुनर्प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT