Goa Theft: भरदिवसा मंगळसूत्र हिसकावले, आरोपी निघाला निलंबित पोलिस! गाडी क्रमांकही बनावट; युवकाच्या सतर्कतेमुळे अटक

Suspended Policeman Arrested Goa: तोरसे येथे रेशन दुकानातील धान्य आणण्यासाठी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळणाऱ्या चोराला युवकाच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली.
Goa Police Crime
Goa Police CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: तोरसे येथे सकाळी रेशन दुकानातील धान्य आणण्यासाठी चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळणाऱ्या चोराला स्थानिक युवकाच्या सतर्कतेमुळे मोपा पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली. विशेष म्हणजे, मंगळसूत्र हिसकावणारा हा चोर आयआरबी पोलिस दलातील निलंबित कर्मचारी निकेश नागेश च्यारी आहे.

सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वासंती रामा शेट्ये ही महिला रेशन कार्डवरील धान्य आणण्यासाठी चालत निघाली होती. तोरसे येथे ती पोहोचली असता मागून स्कूटरवरून आलेल्या युवकाने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले. त्यावेळी घाबरलेल्या महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केला. यावेळी अनुराग शेट्ये हा दुचाकीस्वार येथे पोहचला.

त्याने आपल्या स्कूटरच्या साहाय्याने चोराला अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्याला न जुमानता चोर आपल्या स्कूटरवरून सुसाट वेगाने पळू लागला. परंतु अनुरागने त्याचा पाठलाग सुरूच ठेवला. आपला पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच चोराने तांबोसे येथे पोहोचल्यावर रस्त्यावरच आपली स्कूटर उभी करून रानात धाव घेतली. तरीही अनुरागने चोराला पकडण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. त्याने त्याच स्थितीत मोपा पोलिस ठाण्यात मोबाईलवरून या प्रकाराची माहिती दिली.

Goa Police Crime
Goa Crime: भिंतीवरून मारल्या उड्या, पंचांवर हेल्मेटने हल्ला; दुर्गा-चिंचोणे येथे दिवसाढवळ्या भरवस्तीत घरफोडीचा प्रयत्न

निकेशच्या स्कूटरचा क्रमांकही बनावट

पोलिसांनी संशयित निकेश च्यारी याची झडती घेतली असता, त्याच्याकडे त्या महिलेचे मंगळसूत्र सापडले. त्याच्याकडून जीए-०३-७५१४ या क्रमांकाची स्कूटर पोलिसांनी जप्त केली. विशेष म्हणजे, या स्कूटरचा क्रमांकही बनावट असल्याचे पोलिस तपासात दिसून आले आहे.

Goa Police Crime
Goa Crime: मध्यरात्री 'ड्रग्ज'प्रकरणी युवकाला अटक, 228 ग्रॅम गांजासह स्कूटर-मोबाईल जप्त; शिरगावात कारवाई

यापूर्वी केले होते बालकाचे अपहरण

संशयित निकेश च्यारी हा आरबीआय दलातील निलंबित पोलिस आहे. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री सुकाळे - कोरगाव येथे त्याने एका सहकाऱ्याच्या मदतीने एका बालकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी बाळाच्या कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्यावर शेजाऱ्यांनी त्याला पकडले. बाळाच्या अपहरण प्रकरणानंतर त्याला पोलिस खात्याच्या सेवेतून निलंबित केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com