फातोर्डा: गोव्याचे आणखी किती नुकसान करण्याची तुमची इच्छा आहे? गोवा जमीन हडप प्रकरणात झालेल्या नव्या खुलास्याने भ्रष्टाचाराच्या कॅन्सरने प्रशासनाचा प्रत्येक अवयव पोखरल्याचे दिसून येते. मुख्यमंत्र्यांनी गोव्याचे तारणहार व्हावे आणि सीट खाली करुन, मुख्यमंत्री कार्यालयातून बाहेर पडावे, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, फातोर्डा आमदार विजय सरदेसाई म्हणाले.
आमदार विजय सरदेसाई यांनी सोशल मिडिया एक्सवर त्यांचे मत व्यक्त केले आहे. गोवा जमीन हडप प्रकरणात पोलिस, राजकारणी, लँड माफिया यांच्याही समावेश असल्याचे उघड झाले आहे. गोव्यात दरदिवशी पहिल्या पेक्षा दुसरा मोठा नवा घोटाळा उघडकीस येत आहे. गोवा संकटात असल्याची भावना प्रत्येक गोमंतकीयाच्या मनात निर्माण झालीय. यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.
सुलेमान खान पोलिस कोठडीतून फरार झाल्याच्या प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. पोलिसांनीच मदत करुन खानला हुबळीत सोडल्याचे समोर आले. तसेच, खानला जमीनीचे हस्तांतरण करण्यासाठी राजकीय दबाब होता अशा प्रकारचा आरोप होतोय. जमीन हडप म्हणजे काय याची व्याख्या अद्याप करण्यात आलेली नाही, असे भू-बळकाव प्रकरणाचा तपास करणारा आयोग म्हणतो.
दरम्यान, ४८ भू-बळकाव प्रकरणातील केवळ चार प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. म्हणजेच ४४ प्रकरणात तडजोड केली जाऊ शकते, असे सरदेसाई म्हणाले. दररोज नवा घोटाळा समोर येत आहे. कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरण गाजत असताना आता जमीन हडप प्रकरण समोर आले. दरम्यान, नव्या वर्षात राज्य सरकारला नवे नेतृत्व नवा नवा चेहरा राज्याचे प्रतिनिधित्व करताना पाहायचे आहे.
राज्यातील जनेतेचा विश्वास या सरकाराने गमावला आहे. सरकारला वाचवण्याचा आता एक मार्ग आहे तो म्हणजे सावंत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि खूर्ची खाली करवी, असे सरदेसाई म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.