Supreme Court: अमली पदार्थ घेणे म्हणजे 'कूल' असणे असं नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचे खडेबोल

Supreme Court On Drugs: संपूर्ण देशात ड्रग्ज रॅकेट सुरू आहे ही चिंतेची बाब असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.
Supreme Court: अमली पदार्थ घेणे म्हणजे 'कूल' असणे असं नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा तरुणांना इशारा
Supreme CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Supreme Court

नवी दिल्ली: भारतीय तरुणांमध्ये अमली पदार्थाचे सेवन करण्याच्या वाढत्या ट्रेंडवरुन सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तीव्र चिंता व्यक्त केली. ड्रग्ज घेणे म्हणजे कूल असणे असे नाही, हे टाळायला हवं, असे न्यायमूर्ती बीव्ही नागरथना आणि एन कोतीश्वर सिंग यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. अलिकडे ड्रग्ज घेणे किंवा त्याच्या व्यसनाला बळी पडणे हे कूल असण्याशी जोडले गेले आहे हे अतिशय दुःखद आहे, असे कोर्टाने म्हटले.

न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना आणि न्यायमूर्ती एन. कोतीश्वर सिंग यांच्या खंडपीठाने अंकुश विपन कपूरविरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेच्या तपासावर शिक्कामोर्तब करताना ही निरीक्षणे नोंदवली. सागरी मार्गे पाकिस्तानातून भारतात हेरॉईन तस्करीचे रॅकेट चालवल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

Supreme Court: अमली पदार्थ घेणे म्हणजे 'कूल' असणे असं नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा तरुणांना इशारा
Cash For Job: गोव्यातील भाजप सरकारच्या बदनामीचा कट? पत्रकाराने 'Toolkit' चा Screenshot शेअर केला

अमली पदार्थांच्या गैरवापरामुळे देशातील तरुणाई चुकीच्या दिशेने जात आहे, असे न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना म्हणाले. याचे गंभीर सामाजिक आणि आर्थिक परिणाम होऊ शकतात. तरुणांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी पालक, समाज आणि सरकारी यंत्रणांनाही प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वेही ठरवायला हवीत, असे खंडपीठाने म्हटले आहे.

तरुणांनी अमली पदार्थांचा गैरवापर करणाऱ्यांशी संबंध ठेवू नये. अमली पदार्थांच्या सेवनाला बळी ठरलेले फक्त दलितच नाहीत तर इतरही अनेक लोक आहेत. संपूर्ण देशात ड्रग्ज रॅकेट सुरू आहे ही चिंतेची बाब असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

Supreme Court: अमली पदार्थ घेणे म्हणजे 'कूल' असणे असं नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा तरुणांना इशारा
Goa Crime: गोव्यात हैद्राबादच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिसवाडी येथून एकाला अटक

न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना म्हणाले की, मुले भावनिकदृष्ट्या कुटुंबाशी जोडून राहिली आणि त्या वातावरणाचा प्रभाव पडला, तर त्यांची अंमली पदार्थांच्या व्यसनाला बळी पडण्याची शक्यता खूपच कमी असते.

अंकुश विपन कपूर नावाच्या व्यक्तीविरुद्ध NIA तपासात हस्तक्षेप करण्यास नकार देताना न्यायालयाने ही टिप्पणी केली. एवढेच नाही तर त्याला जामीनही नाकारण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com