
Aap Leaders Amit Palekar Criticized Sawant Government
पणजी: राज्यात सध्या सुरू असलेल्या ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्याच्या तपासकामावर सरकारचे दडपण आहे. या घोटाळ्यामध्ये भाजपमधील उच्चपदस्थ तसेच दलाल सामील आहेत. राज्यात वाढणाऱ्या बेरोजगारीमुळे अशा प्रकारचे घोटाळे करून लोकांची फसवणूक केली जात आहे. हे घोटाळे प्रकरण संसदेत आम आदमी पक्षाकडून उपस्थित केले जाईल, असा इशारा पक्षाचे केंद्रीय नेते संजय सिंग यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
गोव्यात सरकारी नोकरी भरती प्रक्रिया घोटाळे प्रकरण भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून सुरूच आहे. २०१८ मध्ये कनिष्ठ अभियंता भरती तसेच इतर पदांच्या भरतीत घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तत्कालिन मंत्र्याला त्वरित मंत्रिमंडळातून डिच्चू देण्यात आला. विधानसभा निवडणुकीत त्याला भाजपने उमेदवारीही नाकारली.
मात्र लोकसभा निवडणुकीवेळी या माजी आमदाराला पुन्हा भाजपमध्ये (BJP) घेण्यात आले. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. जीएचआरडीसीत कंत्राटी कर्मचारी भरतीतही घोटाळा झाल्याचे गोवा‘आप’ने उघडकीस आणले. अटकेतील दलालांनी अनेक उच्चपदस्थांची नावे उघड केली. मात्र पोलिसांनी ती दडपली आहेत, असा आरोप सिंग यांनी केला.
गोवा राज्य हे निसर्गासाठी जगात प्रसिद्ध आहे. मात्र, हा गोवा (Goa) आता घोटाळ्याची भूमी म्हणून देशभर नावारुपास आला आहे. या घोटाळ्यात भाजपचे कोणीच गुतंलेले नाही,असा दावा वारंवार सरकारकडून केला जात आहे. तरी ही चौकशी न्यायालयीन आयोगामार्फत करण्याची मागणी करूनही ती का दिली जात नाही, असा प्रश्न गोव्यातील आपचे अध्यक्ष अमित पालेकर यांनी केला. या घोटाळ्यामध्ये सरकारबरोबर पोलिसाचे काही कर्मचारी गुंतलेले आहेत. त्यामुळे गोव्यातील भरती प्रक्रिया ही स्वतंत्रपणे होते यावर लोकांचा विश्वास उडाला आहे. सरकार या प्रकरणाची चौकशी सखोल करू इच्छित नाही कारण त्यांचाच पर्दाफाश होईल, याची भीती आहे असे पालेकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.