Cooch Behar Trophy 2023 Dainik Gomantak
गोवा

Cooch Behar Trophy: पंजाबने उभारला 418 धावांचा डोंगर; गोव्याचा युवा संघ फलंदाजी विसरला

पंजाबने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी पहिल्या डावात चारशे धावा पार केल्या.

किशोर पेटकर

Cooch Behar Trophy: पतियाळा येथील ध्रुव पांडोव क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात यजमान पंजाबने ४१८ धावांचा डोंगर उभारला. त्याच मैदानावर गोव्याचे खेळाडू फलंदाजी विसरले. त्यांचा पहिला डाव ६९ धावांत गारद झाला, नंतर फॉलोऑननंतर ६ बाद ५० धावा अशी दारुण स्थिती झाली.

पंजाबने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी पहिल्या डावात चारशे धावा पार केल्या. झुंजार दीडशतक केलेल्या अर्जुन राजपूत याने तळाच्या फलंदाजांसह समर्थपणे किल्ला लढविल्यामुळे यजमान संघाला मोठी धावसंख्या उभारता आली.

सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर पंजाबने ७ बाद ३१६ धावा केल्या होत्या, तेव्हा अर्जुन ७७ धावांवर नाबाद होता. शनिवारी तो १५८ धावांवर बाद झाला. त्याने २२६ चेंडूंचा सामना करताना २६ चौकार व १ षटकार मारला.

गोव्याची चिंताजनक फलंदाजी

गोव्याने दोन्ही डावात चिंताजनक फलंदाजी केली. पहिल्या डावात अखेरच्या ६ विकेट १३ धावांत गमावल्यामुळे त्यांचा डाव ६९ धावांत गारद झाला व पंजाबला ३४९ धावांची भलीमोठी आघाडी मिळाली.

फॉलोऑननंतर वीर यादव ३० धावांवर बाद झाल्यानंतर गोव्याची पुन्हा घसरगुंडी उडाली. फक्त २ धावांत ५ विकेट गमावल्यामुळे दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद ५० अशी दारुण स्थिती झाली. तळाच्या ४ विकेट बाकी असून अजून २९९ धावांनी मागे असल्यामुळे रविवारी सकाळीच गोव्याचा प्रचंड मोठा पराभव निश्चित आहे.

गोव्याचे शंतनू नेवगी व दर्पण पागी दोन्ही डावात शून्यावर बाद झाले. दर्पण याला आता सलग तिसऱ्या डावात भोपळा फोडता आला नाही. त्रिपुराविरुद्धही तो दुसऱ्या डावात शून्यावर बाद झाला होता.

संक्षिप्त धावफलक

पंजाब, पहिला डाव (७ बाद ३१६ वरून): ११० षटकांत सर्वबाद ४१८ (अर्जुन राजपूत १५८, पुंडलिक नाईक २४-५-७८-२, स्वप्नील गावकर २५-४-७९-१, युवराज सिंग ३०-७-१०८-४, यश कसवणकर २२-४-६३-२, शिवांक देसाई ४-०-३९-०, शंतनू नेवगी ५-०-३५-०).

गोवा, पहिला डाव: ४२.३ षटकांत सर्वबाद ६९ (वीर यादव ४, शंतनू नेवगी ०, निसर्ग नागवेकर १०, यश कसवणकर ९, जीवन चित्तेम २०, दिशांक मिस्कीन १९, दर्पण पागी ०, पुंडलिक नाईक ०, शिवांक देसाई नाबाद ०, युवराज सिंग ०, स्वप्नील गावकर ५, अर्पण वालिया २१-२, अनमोलजीत ३२-५, शुभम राणा १२-३).

गोवा, दुसरा डाव (फॉलोऑन): २२ षटकांत ६ बाद ५० (वीर ३०, शंतनू ०, दिशांक ६, निसर्ग ०, यश नाबाद ७, जीवन ०, दर्पण ०, स्वप्नील नाबाद ०, शुभम राणा ५-४).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT