Cashew Fruit Dainik Gomantak
गोवा

Sanguem: अभयारण्याच्या हद्दीतील काजू गोळा करण्यावरून भाटीत वाद! 'पावणी' बंदनंतर वाढला गोंधळ; शासनाने लक्ष घालण्याची मागणी

Sanguem Cashew Problem: मळ्यांचा समावेश नेत्रावळी अभयारण्यात झाल्यामुळे गेल्या तीन चार वर्षापासून पावणी अर्थात लिलाव करणे बंद केले आहे.

Sameer Panditrao

सांगे: सांगे तालुक्यातील भाटी परिसरात काही काजू मळ्याचा नेत्रावळी अभयारण्यात समाविष्ट झाल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पावणी (लिलाव) करणे वन विकास महामंडळाकडून बंद करण्यात आले. त्यामुळे याचा फायदा घेऊन अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार ठराविक लोक त्याचा उपभोग घेत आहेत.

यंदा काजू हंगाम सुरू होताच, तेच ठरावीक लोक आम्ही हे काजूचे मळे घेतले आहेत, असा पवित्रा घेऊ लागले. मात्र काही कागदपत्र दाखवू शकले नाही. त्यामुळे इतरांना संशय आला. काहींनी सांगेचे आमदार आणि मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या याबद्दल माहिती दिली आहे. काही लोक पावणी न केलेल्या या काजूच्या मळ्यात घुसून गेल्या पाच सहा दिवसापासून काजू गोळा करीच आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाद, भांडणे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशी स्थानिकांची मागणी आहे.

भाटी भागात अंदाजे दहा वन विकास महामंडळाचे काजूचे मळे आहेत. मात्र या मळ्यांचा समावेश नेत्रावळी अभयारण्यात झाल्यामुळे गेल्या तीन चार वर्षापासून पावणी अर्थात लिलाव करणे बंद केले आहे. त्यामुळे पूर्वी जे लोक पावणी घेत होते, तेच आपण पैसे भरून हा मळा काजू गोळा करण्यासाठी घेतला आहे, असे सांगून उपभोगीत असत.

पण यंदा हे बिंग बाहेर आले. जर तुम्ही हा मळा घेतला असेल, तर आम्हांला एखादे कागदपत्र दाखवा असा पवित्रा गावातील अन्य लोकांनी घेतला. पण सत्यता पुढे न आल्याने तुम्हीच का? आम्हीही सरकारी फायदा घेतो असे सांगत गावातील इतर लोक काजू गोळा करू लागले आहेत. त्यामुळे संघर्ष होण्याची चिन्हे वाढली आहे.

एकेकाळी वन विकास महामंडळाला भाटी भागातील भाटीमळ, बोंबडीमळ, विलीयन, सायलागाळ येथील काजू मळ्याची पावणी करून लाखो रुपये मिळत असत. मात्र या मळ्याचा नेत्रावळी अभयारण्याच्या नावाखाली पावणी करणे बंद केल्यामुळे सरकारचे लाखो रुपये वाया गेले आहेत. जंगली जनावरांनी काजू, काजूच्या बिया खाव्यात म्हणून सोडण्यात आले. पण आत्ता गावकरीच उपभोगीत आहे. त्यामुळे मूळ उद्देशच नष्ट होत आहे, असे निसर्गप्रेमीचे म्हणणे आहे.

सुसूत्रता आणावी

लोकांकडून बेकायदेशीर काजू गोळा करण्यास वन विभागाची हरकत नसल्यास पूर्वी प्रमाणे वन विकास महामंडळाने सदर काजू मळ्याची पावणी करावी, अशी मागणी होत आहे. वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष दिव्या राणे आणि वनमंत्री विश्वजित राणे यांनी या प्रकरणात लक्ष घालून सुसूत्रता आणावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT