Cashew: काजू, फुटबॉल आणि कार्निव्हल यांचे मूळ ब्राझील, GI मानांकन मात्र गोव्याच्या फेणी आणि काजूला

Goa Cashew: २००९ यावर्षी जीआय मानांकन मिळालेल्या ‘काजू फेणी’ला योग्य वर्गीकरण मिळावे यासाठी आता कामाला गती दिली जात आहे.
Cashew Fruit
CashewCanva
Published on
Updated on

मिंगेल ब्रागांझा 

गेली सहस्त्राब्दी संपण्याच्या सुमारास जे. के. दादू हे आयएएस अधिकारी गोव्यात असताना सरकारने काजू फेणीच्या भौगोलिक मानांकनाच्या (जीआय नोंदणी) प्रयत्नांना सुरुवात केली. त्याच सुमारास डेस्मंड नाझारेथ मेक्सिकोच्या ग्वाडालजारा प्रांताच्या बाजूने भारतीय ‘आगावे अमेरिकाना’ मधून उत्पादित केलेल्या टकीलाच्या भौगोलिक मानांकनासाठी प्रयत्न करत होते. जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे असे म्हणतात.... दोघेही आपल्या मार्गावर यशस्वी ठरले. 

२००९ यावर्षी जीआय मानांकन मिळालेल्या ‘काजू फेणी’ला योग्य वर्गीकरण मिळावे यासाठी आता कामाला गती दिली जात आहे. उत्पादनाच्या गुणवत्तेच्या हमीसाठी नाव देखील तितकेच महत्त्वाचे असते.

काजू, फुटबॉल आणि कार्निव्हल यांचे मूळ जरी ब्राझीलमध्ये असले तरी काजू  फेणी आणि गोवा काजू या दोन्हीसाठी जीआय मानांकन मिळण्याचा सन्मान गोव्याने मिळवला आहे. १९७०च्या दशकापासून कार्निव्हलने पर्यटनाला चालना देण्यासाठी आपले योगदान दिले आहे. आता आपण काजू 'कॅश' करण्यासाठी शिकले पाहिजे. खऱ्या उद्योजकतेची तीच कसोटी असते. 

१९७० च्या दशकाच्या सुरुवातीस आनंद गजानंद फळारी यांनी वेंगुर्ला मालिकेतील (V-1 ते V-4) काजू कलमांची लागवड अस्नोडापासून अवघ्या अंतरावर असलेल्या नानोडा येथील टेकडीवर केली.

वेंगुर्ला येथील एका नर्सरीमधून गोवा दमण आणि दीव सरकारच्या कृषी संचालनालयाने त्यांना आणि इतर शेतकऱ्यांना ही कलमे मिळवून दिली होती. १९८३ मध्ये त्यांनी वेंगुर्ला येथून एक माळी मिळवून सुमारे एक हजार कलमे तयार केली.

Cashew Fruit
Cashew Fruit: रसरशीत 'काजू बोंडू' बाजारात दाखल; जाणून घ्या दर

त्यांची लागवड करून त्यांच्या बागेतील पोकळी भरून काढल्यानंतरही त्यांच्याकडे सुमारे ५०० कलमे शिल्लक राहिली होती. तत्कालीन फलोत्पादन अधिकारी रमेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या देखरेखीखाली १९८४मध्ये ही कलमे खरेदी करून डिचोली क्षेत्रातील ५० शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली. लागलीच या कलमांना  १९८४ च्या उत्तरार्धात फुलांचा बहर आला. १९८५ मध्ये पुन्हा ५००० कलमांची ऑर्डर देण्यात आली. पुढचा सारा इतिहास आहे. 

वेंगुर्ला-४० हे लाल फळे आणि मोठी काजू बी देणारे झाड आहे. जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत ते उत्पादन देण्यासाठी तयार असते. जर तुम्ही फेब्रुवारी महिन्यात हुर्राक पीत असाल तर लवकर फळ धरणाऱ्या आणि उत्पादन देणाऱ्या या काजूच्या जातीचे तुम्ही आभार मानायला हवेत.

Cashew Fruit
Cashew Season: रानमेवा आला रे! ओल्या काजूगरांची खवय्यांना भुरळ..

 ओल्ड गोवा येथील ICAR- CCAR (सेंट्रल कोस्टल एग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट)ने विशिष्ट उपयोगासाठी गोवा १,२,३ आणि ४ यांची निवड केली आहे. सिंचनाची चांगली व्यवस्था असल्यास आता, या महिन्यात किंवा पावसावर अवलंबून असलेल्या परिस्थितीत जूनमधील पहिला पाऊस सुरू झाल्यानंतर त्यांची लागवड करण्यासाठी सर्वोत्तम काळ असतो. पण कोणत्याही परिस्थितीत, तुम्ही आत्ताच कलम खरेदी करणे चांगले ठरेल.

वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने ‘काजू’ हे फळ नाही मात्र त्यातून निघालेला रस मात्र गोव्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यातून बनणारे हुर्राक गोमंतकीय संपूर्ण उन्हाळाभर पितात. उन्हाळ्यानंतर मात्र त्याची फेणी बनते.  हुर्राक आणि फेणी उत्पादनासाठी पारंपारिक 'लावणी' ही सर्वात उत्तम पद्धत आहे‌ आणि विशेष म्हणजे या दोन्ही पेयांचा आस्वाद भाजलेल्या काजू बरोबरच छान घेता येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com