Panaji Traffic Jam Due To Road Closure
पणजी: सांतिनेज तसेच पणजी शहरातील रस्ते अचानक वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे वाहनचालक आणि स्थानिक व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. कोलमडलेली वाहतूक नियंत्रणात आणण्यास वाहतूक पोलिसही रस्त्यावर फिरकले नसल्याने लोकांच्या संतापात अधिक भर पडली.
उत्तर गोवा जिल्हाधिकारी किंवा वाहतूक पोलिसांकडून कोणतीही पूर्वसूचना न देता कंत्राटदाराने गुरुवारी अचानक रस्ते बंद केले. त्यामुळे शहरातील वाहतूक कोलमडली आहे. यामुळे प्रशासनाच्या नियोजन व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
वाहतूक मार्ग बंद केल्यावरही रस्ता बंद असल्याचे वाहनचालकांना सूचित करणारे कोणतेही फलक किंवा दिशादर्शक सूचना उपलब्ध नव्हते. यामुळे वाहनचालक रस्ता बंद असल्याचे समजल्यानंतर गाड्या मागे वळविणे भाग पडत होते. यामुळे दोन्ही बाजूने वाहनांची कोडी झाल्याने वाहतूक कोलमडली. वाहतूक पोलिसांचा पूर्ण अभाव असल्यामुळे हा गोंधळ अधिकच वाढला.
वाहतूक कोंडीमुळे कामावर जाणारे कर्मचारी तसेच तातडीच्या सेवांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास झाला. रस्ते बंद करताना नागरिकांना किंवा वाहनचालकांना काहीच पूर्वसूचना न देता घेतलेल्या या निर्णयामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे पुन्हा एकदा दर्शन घडले. कोणताही मार्गदर्शक फलक, वाहतूक पोलिसांची मदत किंवा पर्यायी मार्गाबाबत कोणतीही माहिती न मिळाल्यामुळे स्थानिक संतप्त होऊन काहीही चूक नसलेल्या रस्त्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओरडताना दिसले.
सांतिनेज परिसरातील व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार अचानक रस्ते वाहतुकीस बंद केल्याने व्यवसायात नुकसान सहन सहन करावे लागले. ग्राहकांना दुकानावर पोहोचणे कठीण झाल्याने विक्रीवर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे आमचा व्यवहार ठप्प झाला. प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना दिली नाही, ही बाब अत्यंत संतापजनक आहे, असे एका व्यावसायिकाने सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.