Panaji Police: पुरावा म्हणून पोलिस स्थानकात हजर केली म्हैस; पणजीत शेतकऱ्याचे 6 लाखांचे नुकसान

Panaji Police Station: तब्बल ६ लाखांचे नुकसान झाल्याची तक्रार नॅथन डिसोझा या शेतकऱ्याने पणजी पोलिसांत नोंदविली आहे.
Panaji Police: पुरावा म्हणून पोलिस स्थानकात हजर केली म्हैस; पणजीत शेतकऱ्याचे 6 लाखांचे नुकसान
Panaji Police StationDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji Police Station

पणजी: एरवी तक्रारदार पुरावा म्हणून एखादी वस्तू किंवा दस्तऐवज पोलिसांत सादर करतात. मात्र, आज शेतीच्या नुकसानीस जबाबदार म्हणून तक्रारदाराने चक्क म्हैसच पोलिस ठाण्यात हजर केली. या अजब प्रकाराची आज दिवसभर चर्चा सुरू होती.

त्याचे झाले असे की, मागील काही दिवस कानावर शिक्का लटकवलेली एक म्हैस ताळगाव येथील एका शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान करत होती. या म्हशीने पिकांची नासधूस तर केलीच, शिवाय पिकांसाठी लावलेली ठिबक सिंचनाच्या पाईप पायाने तुडवून मोडून टाकल्या. त्यामुळे आपले तब्बल ६ लाखांचे नुकसान झाल्याची तक्रार नॅथन डिसोझा या शेतकऱ्याने पणजी पोलिसांत नोंदविली आहे.

Panaji Police: पुरावा म्हणून पोलिस स्थानकात हजर केली म्हैस; पणजीत शेतकऱ्याचे 6 लाखांचे नुकसान
Suleman Khan: खळबळजनक! सुलेमान खानच्या पलायनाचा 3 कोटी रुपयांत झाला सौदा; मध्यस्थी कोण? गोव्यात रंगली चर्चा

हे करताना त्याने पुरावा म्हणून टेम्पोमधून ती म्हैसच पोलिस ठाण्यात आणली होती. समाज कार्यकर्त्या सेसिल रॉड्रिग्स यांच्यासोबत या शेतकऱ्याने शनिवारी पणजी पोलिसांत तक्रार नोंदविली. या आगळ्यावेगळ्या पुराव्याची खमंग चर्चा सर्वत्र सुरू होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com