police station assault case Dainik Gomantak
गोवा

Sexual Harassment Case: खाकी वर्दीतील हैवान! ऑन ड्युटी कॉन्स्टेबलकडून पोलीस स्टेशनमधेच महिलेचा लैंगिक छळ; तब्बल 13 वर्षांनंतर मिळाला न्याय

woman harassment by police constable: म्हापसा न्यायालयाने पोलीस कॉन्स्टेबलला एका महिलेवर जबरदस्ती करत अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवले

Akshata Chhatre

म्हापसा: राज्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, म्हापसा न्यायालयाने एका पोलीस कॉन्स्टेबलला एका महिलेवर जबरदस्ती करत अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. या महिलेला शहरातून सुटका केल्यानंतर म्हापसा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले होते.

१३ ऑगस्ट २०११ रोजी घडलेल्या या घटनेनुसार, म्हापसा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या या कॉन्स्टेबलने ड्यूटीवर असताना महिलेला अश्लील शब्द वापरून शिवीगाळ केली, अश्लील हावभाव केले, तिला मारहाण केली आणि मग तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

"कुणीही ऐकून घेणार नाही"

याशिवाय, कॉन्स्टेबलने पीडितेसोबत जबरदस्तीने लैंगिक छळ केल्यानंतर हा प्रकार बाहेर सांगितल्यास तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली.

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, त्याने तिला कुणालाही याबद्दल माहिती न देण्याची धमकी दिली होती आणि अशा स्थितीत जर का तिने कोणाला सांगण्याचा प्रयत्न केला तर कुणीही तिचे ऐकून घेणार नाही आणि शेवटी तोच बरोबर ठरेल अशी भीती पीडितेच्या मनात निर्माण केली होती.

या प्रकरणाचा तपास अँटी-नारकोटिक्स सेलच्या एसपी सुनीता सावंत यांनी केला होता, ज्या तत्कालीन क्राईम ब्रँचच्या पीआय होत्या. त्यांनी कॉन्स्टेबलविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते मात्र ज्यात त्याने स्वतःला निर्दोष असल्याचे सांगितले होते. आता न्यायालयाने सर्व साक्षीपुरावे आणि युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कॉन्स्टेबलला दोषी ठरवले आहे आणि या घटनेमुळे पुन्हा एकदा पोलीस दलात आणि राज्यात खळबळ उडाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

Vijayanagar Empire: राजा हरिहरच्या आदेशाने, बहामनी सल्तनतीकडून गोवा जिंकले; राजा अच्युतदेवरायाचा दुर्लक्षित इतिहास

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

SCROLL FOR NEXT