Fake Police In Goa: गोव्यात स्पेशल 26! खऱ्या पोलिसांना तोतया पोलिस सापडेनात; गंडा घालून होतायेत फरार

Fake Police Goa Incident: पोलिस असल्याचे भासवून गंडा घालण्याच्या दोन घटना हल्लीच या तालुक्यात नोंद झाल्या आहेत. यातील एक घटना कोलवा तर दुसरी मडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
Fake Police Goa Incident
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: तोतया पोलिस खऱ्या पोलिसांना सापडत नाहीत, अशी विचित्र स्थिती सासष्टी तालुक्यातील पोलिसांची झाली आहे. पोलिस असल्याचे भासवून गंडा घालण्याच्या दोन घटना हल्लीच या तालुक्यात नोंद झाल्या आहेत. यातील एक घटना कोलवा तर दुसरी मडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पीडित फसवले गेले, परंतु संशयित मोकाट आहेत. संशयितांचा माग काढण्यास पोलिस सपशेल अपयशी ठरले आहेत.  त्‍यामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत.

पहिली घटना ११ एप्रिल रोजी घडली होती. कार्मोणा येथील फुर्तादो दाम्पत्याला ‘हॅल्लो, मी दिल्लीहून पोलिस अधिकारी बोलतोय. तुम्ही मनी लाँड्रिंग प्रकरणात गुंतलेले आहात. पोलिस तुमच्या मागावर आहेत. सांगितलेली रक्कम भरा नाही तर या प्रकरणात अडकवू’ अशी धमकी देऊन त्यांना साडेचार लाखांना गंडा घालण्‍यात आला होता.

या प्रकरणी नंतर फिलोमिना डिकॉस्‍टा फुर्तादो व एदुआर्दो फुर्तादो यांनी कोलवा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. भामट्यांनी व्हाट्सॲप व्हिडिओच्‍या माध्यमातून कॉल केला होता. स्वतःचे नाव दीपेश जोशी असे सांगून तक्रारदारांना एका इसमाने व्हिडिओ कॉल केला. त्यात त्याने आपण दिल्ली पोलिस ठाण्याचा तपास अधिकारी असल्याचे भासविले होते.

Fake Police Goa Incident
Goa Crime: गोव्यात 24 तासांत 3 मोठ्या कारवाया! पणजी, आसगाव, हणजुणेतून 15 लाखांचे ड्रग्ज जप्त; 5 जणांना अटक

मनी लॉड्रिंग प्रकरणात अडकवण्‍याची धमकी

‘फिलोमिना डिकॉस्‍टा फुर्तादो यांच्यावर मनी लॉड्रिंग प्रकरण आहे. तुम्‍ही गोत्यात येऊ शकतात. त्‍यामुळे सिद्धेश अजय याच्या बँक खात्यावर रक्कम भर’ अशी दमदाटी करण्‍यात आली होती. घाबरून या तक्रारदाराने रक्कम भरली व नंतर आपण फसविलो गेलो हे त्यांच्या लक्षात आले होते. मागाहून या प्रकरणी कोलवा पोलिसांत तक्रार नोंदविली होती.

Fake Police Goa Incident
Pune Crime: पुण्यात गोवा बनावटीची बनावट दारु जप्त; 52 लाखांचा मुद्देमाल जप्त, जळगावच्या तरुणाला अटक

मासळी पुरवठादाराला ४ लाख ८३ हजारांना लुबाडले

दुसरी घटना ७ मे रोजी भरदिवसा शिरली-धर्मापूर येथील राष्ट्रीय हमरस्‍त्‍यावर घडली होती. मडगाव मासळी मार्केटात मासळी पुरवठा करून परत जात असताना मूळ कारवार जिल्‍ह्यातील मुर्डेश्‍‍वर येथील श्रीधर मोगेर या मासळीवाहू वाहनचालकाला दोन भामट्यांनी आपण पोलिस अधिकारी असल्याचे सांगून अडविले. नंतर त्याच्याकडील ४ लाख ८३ हजार रोकड पळवून पोबारा केला होता. या प्रकरणी मडगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंद झाली असून, पोलिसानी अनोळखी संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरु असल्याचे पोलिस सांगतात, मात्र अजूनही संशयित पोलिसांना सापडू शकलेले  नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com