Goa Crime: गोव्यात 24 तासांत 3 मोठ्या कारवाया! पणजी, आसगाव, हणजुणेतून 15 लाखांचे ड्रग्ज जप्त; 5 जणांना अटक

Goa Drugs Case: वाढत्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी उत्तर गोवा पोलिस व गुन्हे शाखेने संयुक्तपणे अवघ्या २४ तासांत तीन मोठ्या कारवाया करत पाच संशयितांना अटक केली.
Goa Drug Case
Goa Drug CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील अमलीपदार्थांच्या वाढत्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी उत्तर गोवा पोलिस व गुन्हे शाखेने संयुक्तपणे अवघ्या २४ तासांत तीन मोठ्या कारवाया करत पाच संशयितांना अटक केली. १५ लाख ९२ हजार रुपयांचे एमडीएमए, कोकेन व चरस जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये आंतरराज्यीय ड्रग्स तस्करांचाही समावेश आहे. उत्तर गोवा व गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी ही माहिती दिली. पोलिसांच्या या कारवायांनी राज्यातून अमलीपदार्थांच्या साखळीवर प्रहार करण्याचा त्यांचा निर्धार पुन्हा अधोरेखित केला आहे, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, १७ मे रोजी पहाटे गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे पणजीत मध्यवर्ती ग्रंथालयाजवळ सापळा रचून तीनजणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सजीर मोहम्मद अली (३३), मोईदिन अश्मिन (२२) व मोहम्मद सुहेल (२१) यांचा समावेश आहे. ते तिघेही कर्नाटकातील उडुपीचे रहिवासी आहेत.

Crime Case
Crime CaseDainik Gomantak

त्यांच्याकडून तब्बल ९१.९३४ ग्रॅम एमडीएमए, एक बलेनो कार व सात मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या अमलीपदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे १२ लाख रुपये आहे. याप्रकरणी ‘एनडीपीएस’ कायद्याच्या कलम २२(क) व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वजण पोलिस कोठडीत आहेत.

Goa Drug Case
Quepem Crime: प्रेयसी प्रतारणा करते, शंकेने केला खुनी हल्ला; गोव्यातून गाठली रत्नागिरी, संशयिताला सांगलीतून घेतले ताब्यात

असगावात ‘एमडीएमए’ सापडले

शुक्रवार, १६ मे रोजीच्या रात्री आसगाव येथील सेंट कॅजेटन चर्च परिसरात हणजुणे पोलिसांनी छापा टाकून संतोष नेमप्पा लमाणी (२४, मूळचा कर्नाटक, सध्या रा. हणजुणे) याला अटक केली. त्याच्या बॅगेत ९.४९ ग्रॅम एमडीएमए व ४.४६ ग्रॅम कोकेन सापडले, ज्याची एकूण किंमत सुमारे २.१० लाख रुपये आहे. याप्रकरणी एनडीपीएस कायद्याच्या कलम २२(ब) व २१(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Goa Drug Case
Goa Drug Case: गोवा पोलिसांचा दणका! शिवोलीत 11 कोटींच्या अमली पदार्थासह केरळमधील एकाला अटक

हणजुणेत सापडला ‘हिमाचल’चा संशयित

शुक्रवार, १६ मे रोजी सायंकाळी पिकेन-पेडे-हणजुणे येथील फुटबॉल मैदानाजवळ आणखी एका छाप्यात हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील अनिल हेट राम कुमार (२६) याच्याकडून १८२ ग्रॅम चरस व ४३ हजार रुपये जप्त करण्यात आले. चरसची किंमत सुमारे १.८२ लाख रुपये असून संशयिताने तो कमरेच्या पिशवीत लपवलेली होता. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम २०(ब)(ii)(ब) नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com