Devendra Fadnavis Dainik Gomantak
गोवा

Devendra Fadnavis: फुटीरतावादी शक्तींसोबत कॉंग्रेसची युती! फडणवीसांनी डागली तोफ

Goa BJP Office: भाजपच्या नव्या कार्यालय इमारतीचा शिलान्यास केल्यानंतर ताळगाव येथील समाज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यघटनेच्या रक्षणाचा आव आणणारा कॉंग्रेस पक्ष प्रत्यक्षात फुटीरतावाद्यांसोबत आहे. त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्ससोबत युती करून आपली भूमिका उघड केली आहे. आजवर ३७० कलमामुळे तेथे अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीयांना आरक्षण मिळत नव्हते. भाजपने ते कलमच राज्यघटनेतून हटविल्याने आरक्षण मिळू लागले.

आता नॅशनल कॉंन्फरन्सने सत्तेवर आल्यास ते कलम लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्यासोबत कॉंग्रेसने युती केली आहे, असा आरोप महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सायंकाळी उशिरा ताळगाव येथे केला.

कदंब पठारावर भाजपच्या नव्या कार्यालय इमारतीचा शिलान्यास केल्यानंतर ताळगाव येथील समाज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासह मंत्री, आमदार तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात देशविघातक शक्ती लढत होत्या. त्यावेळी आम्ही सजग नव्हतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतानाच देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न या शक्ती करत होत्या. त्यांना देशात निर्नायकी स्थिती आणायची होती. आता लोकशाही वाचवण्याची, देशासाठी या शक्तींविरोधात लढण्याची जबाबदारी भाजपच्या कार्यकर्त्यांना घ्यावी लागेल.

फडणवीस यांना उशीर

महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. फडणवीस हे यवतमाळच्या दौऱ्यावर होते. तेथे पावसाळी हवामान असल्याने त्यांना घेऊन येणारे हेलिकॉप्टर दीड तास उडू शकले नाही. त्यामुळे त्यांना गोव्यात पोचण्यास उशीर झाला. चार वाजताचा कोनशिलेचा कार्यक्रम सहा वाजता झाला.

किल्ल्यांची जागा घेतात कार्यालये

फडणवीस म्हणाले की, पूर्वीच्या काळी छत्रपती शिवाजी महाराज एखादा मुलूख जिंकला की, तेथील व्यवस्था लावण्यासाठी तटबंदी असलेला किल्ला बांधत असत. आताच्या लढाया या तलवारीऐवजी मतांच्या माध्यमातून लढल्या जातात. किल्ल्यांची जागा कार्यालयांनी घेतली आहे. यासाठी पक्षाचे हे नवे कार्यालय कार्यकर्त्यांना देशविरोधी शक्तींविरोधात लढण्यासाठी बळ देईल, यात शंका नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

Goa Cabinet: चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळात होऊ शकतो बदल; दामू नाईकांचा संकेत; मुख्‍यमंत्र्यांकडून ‘सस्‍पेन्‍स’ कायम

Coconut Price Goa: 45 रुपयांचा नारळ स्वस्त कसा? विजय सरदेसाईंचा सवाल

SCROLL FOR NEXT