Devendra Fadnavis: आज देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कोनशिला बसवणार! जे. पी. नड्डांऐवजी उपमुख्यमंत्री गोव्यात

Goa BJP State Headquarters: भाजपच्या राज्य मुख्यालय इमारतीची कोनशिला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बसविण्यात येणार आहे
Goa BJP State Headquarters: भाजपच्या राज्य मुख्यालय इमारतीची कोनशिला  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बसविण्यात येणार आहे
Devendra FadnavisDainik Gomantak
Published on
Updated on

Goa BJP Office

पणजी: भाजपच्या राज्य मुख्यालय इमारतीची कोनशिला शनिवारी सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बसविण्यात येणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा गोवा दौरा काही कारणास्तव रद्द झाला आहे.

मुख्य कार्यक्रम ताळगाव येथील समाज सभागृहात ४.३० वाजता होणार आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ही माहिती दिली. या इमारतीच्या पायाभरणीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा येणार होते. त्यांना निमंत्रित करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्ली गाठली होती.

तेथे तानावडे यांच्यासोबत नड्डा यांची भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. मात्र, काही कारणास्तव नड्डा येऊ न शकल्याने तानावडे यांनीच स्वहस्ते भूमिपूजन करून कामास सुरवात करून दिली होती.

Goa BJP State Headquarters: भाजपच्या राज्य मुख्यालय इमारतीची कोनशिला  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बसविण्यात येणार आहे
Goa BJP: भाजपमधील सुंदोपसुंदीची दिल्लीत दखल

आता भाजपच्या गाभा समितीची बैठक चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्या (शनिवारी) दिल्लीतील भाजप मुख्यालयात होणार असल्याने नड्डा यांनी गोव्यात येणे शक्य नसल्याचे आज कळविले. त्यानंतर त्यांनीच सुचविल्यानुसार फडणवीस यांना उद्याच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहे.

तानावडे यांनी आज सायंकाळी प्रदेश सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर तसेच अन्य नेत्यांसह कार्यक्रमस्थळी भेट देऊन तेथील तयारीचा आढावा घेतला. नवीन कार्यालय संकुलात नेत्यांच्या निवास व्यवस्थेसह, बैठकांसाठी कक्ष, परिषद सभागृह आदींची सोय असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com