Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: "भविष्य सांगू नका, प्रशासन सांभाळा", काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावर सडकून टीका

Goa Congress: मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते असलेल्या काँग्रेसचे राहुल गांधी हे पंतप्रधान होणार नाहीत, अशी लोकांची दिशाभूल करणारी वक्तव्य करू नयेत, अशी टीका काँग्रेसच्या नेत्यांनी केली.

Sameer Amunekar

पणजी: राज्यात आलेल्या मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे दाणादाण उडाली. सरकारची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे कोलमडली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते असलेल्या काँग्रेसचे राहुल गांधी हे पंतप्रधान होणार नाहीत, अशी लोकांची दिशाभूल करणारी वक्तव्य करू नयेत. त्यांनी केंद्रापेक्षा राज्याच्या प्रशासनावर अधिक लक्ष केंद्रीत करावे. त्यांनी काँग्रेसचे भविष्य सांगण्याची गरज नसून देशाचा पंतप्रधान कोण असावा हे जनता ठरवेल, अशी टीका काँग्रेसच्या नेत्यांनी केली.

पणजीतील काँग्रेस भवनात गोवा प्रदेश काँग्रेस समितीतर्फे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची पुण्यतिथी पाळण्यात आली. यावेळी काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर तसेच इतर नेते उपस्थित होते.

यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ‘काँग्रेस नेते राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान होणार नाहीत हे लिहून देतो’, या वक्तव्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना राहुल गांधीबाबत भीती वाटू लागली आहे. गांधी हे पंतप्रधान झाले तर त्यांचे काय यामुळे आतापासूनच त्यांना भीती वाटणे साहजिकच आहे.

मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या पंतप्रधान होण्याच्या संदर्भात अधिक विचार न करता त्यांनी गोव्यातील मान्सूनपूर्व तयारीकडे लक्ष द्यावे,असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

भाजपने लोकसभा निवडणुकीवेळी ‘४०० पार’ ची घोषणा तसेच दक्षिण गोव्यात भाजपचा खासदार निवडून येईल, याबाबत असलेला आत्मविश्‍वास त्यांना नडला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अतिउत्साहीत होऊन कोणाचे भाकीत मांडू नये. - युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

केंद्रात व राज्यात असलेली भाजपची सत्ता मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात गेली आहे. राज्यात दर ३० तासांनी एकाचा रस्ता अपघातात मृत्यू होतो आहे. पहिल्या पावसातच काणकोण रवींद्र भवनला गळती लागली. एका वीज कर्मचाऱ्याचा वीजप्रवाहाचा धक्का बसून मृत्यू झाला. कायदा व सुव्यवस्था कोलमडली आहे त्यामुळे प्रशासनाकडे अधिक लक्ष द्यावे. - अमित पाटकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

वास्कोत भररात्री गोंधळ! प्रार्थनास्थळी दानपेटी फोडली, मूर्तीचे नुकसान, अंतर्वस्त्रे घालून फिरणाऱ्या व्यक्तीवर संशय; कोण आहे हा 'अर्धनग्न' संशयित?

Cooch Behar Trophy: कल्याणी मैदानात रंगला सामना! बंगालविरुद्ध गोव्याचा डाव गडगडला, आता आराध्य-व्यंकट यांची जोडीच तारणहार!

IPL 2026 Auction: दमदार कामगिरीचं फळ! सुयश, ललित अन् अभिनव आयपीएल लिलावात; गोव्याच्या त्रिकूटावर सर्वांच्या नजरा

Zilla Panchayat Election: 'मागच्या दरवाजानं काँग्रेसमध्‍ये कुणालाही प्रवेश दिला नाही', जिल्हाध्यक्षांनी स्पष्टचं सांगितलं; सासष्टीतील पाचही जागांसाठी अर्ज दाखल

Zilla Panchayat Election: धारगळ मतदारसंघात काँग्रेसमध्‍ये उफाळला कलह, ऐनवेळी ज्ञानेश्‍‍वर शिवजी यांना उमेदवारी नाकारल्‍याने बंडाचा सूर

SCROLL FOR NEXT