Goa ZP Election Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: काँग्रेसचे 'वरिष्ठ' नेते येणार गोव्यात! गोवा फॉरवर्डची यादीही रखडली; भाजपचा 7 अपक्षांना पाठिंबा

Goa Zilla Panchayat Election: काँग्रेससोबतच्या युतीचा विषय गुलदस्त्यात ठेवत रिव्हॉल्युशनरी गोवन्स पार्टीने (आरजीपी) जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी १२ उमेदवारांची घोषणा केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: काँग्रेससोबतच्या युतीचा विषय गुलदस्त्यात ठेवत रिव्हॉल्युशनरी गोवन्स पार्टीने (आरजीपी) जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी १२ उमेदवारांची घोषणा केली. त्‍यावर काँग्रेसने कोणताही आक्षेप न घेता नरमाईची भूमिका घेतल्याने काँग्रेस-गोवा फॉरवर्ड-आरजीपी या तीन पक्षांच्‍या युतीची शक्‍यता अद्याप कायम आहे.

युतीसंदर्भात काँग्रेस निर्णय घेणार आहे. तसेच आणखी २५ नावांवर शिक्‍कामोर्तब होईल. काँग्रेसने यापूर्वीच जिल्हा पंचायत निवडणुकीतील ११ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यावेळी युतीतील घटक पक्षांना माहिती देण्यात आली नव्हती. आम्ही आरजीपीला युतीचा प्रस्ताव दिला आहे; मात्र अद्याप त्यांच्या बाजूकडून अधिकृत उत्तर आलेले नाही.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते शुक्रवारी गोव्यात येणार असून, त्यांच्या उपस्थितीत उर्वरित जागांबाबत चर्चा करून युतीची औपचारिक घोषणा केली जाईल, अशी माहिती अमित पाटकर यांनी दिली. प्रत्‍यक्षात विरोधी पक्षांमध्‍ये विसंवाद वाढत असून, तरीही युतीची चर्चा सुरू आहे. युती मोडल्‍याचे खापर आपल्‍यावर फुटू नये, यासाठी पक्ष धडपडत आहेत, अशीच स्‍थिती आहे.

काँग्रेसने सोडलेल्या जागीच आरजीपीचे उमेदवार

काँग्रेस आणि आरजीपी यांच्यातील जागा वाटपाच्या चर्चेत काँग्रेसने आरजीपीसाठी ज्या जागा सोडल्या होत्या, त्याच जागांवर आरजीपीने उमेदवार जाहीर केले आहेत. ‘‘काँग्रेससोबत युती हवी म्हणूनच आम्ही आतापर्यंत उमेदवार जाहीर केले नव्हते. काही जागांबाबत चर्चा सुरू होती’’, असे आरजीपी अध्यक्ष मनोज परब यांनी सांगितले.

गोवा फॉरवर्डची यादी युतीनंतरच

गुरुवारी श्रीदत्त जयंतीच्या मुहूर्तावर गोवा फॉरवर्डची यादी जाहीर होणार होती; मात्र ती रखडली. काँग्रेससोबतच्या बैठकीनंतर युतीवर शिक्कामोर्तब झाल्यावरच यादी जाहीर केली जाणार असल्याचे गोवा फॉरवर्डच्या सूत्रांनी सांगितले. युती करण्‍याचे घाटत असले तरी त्‍यामध्‍ये अनेक अडथळे आहेत याची जाणीव सरदेसाई यांना असल्‍यानेच त्‍यांनी बऱ्याच दिवसांपूर्वीच तयार सुरू केली आहे. युती होईल अशी सरदेसाई आशा बाळगून आहेत.

आरजीपीचे उमेदवार

तोरसे - नारायण शिरोडकर

शिवोली - जयंद्रनाथ प्रियोळकर

कोलवाळ - प्रज्ञा सावंत

शिरसई - सिप्रियान परेरा

हणजूण - मिंगेल क्युरोज

सांताक्रुझ - इस्प्रेंका ब्रागांझा

सेंट लॉरेन्स -तृप्ती बकाल

बेतकी- विनय गावडे

वेलिंग-प्रियोळ- नीता जल्मी

कवळे - विश्‍‍वेश नाईक

बोरी - हर्षा बोरकर

शिरोडा दीपनीती शिरोडकर

भाजपचा ७ अपक्षांना पाठिंबा; ३ जागा मगोला

भाजपने जिल्‍हा पंचायत निवडणुकीतील उमेदवारांची अंतिम यादी गुरुवारी जाहीर केली. दवर्लीत सत्‍यविजय नाईक आणि नावेलीत लक्ष्‍मी शेटकर यांच्‍या नावांवर शिक्‍कामोर्तब करण्‍यात आले.

या निवडणुकीत भाजपचे ४० उमेदवार लढणार आहेत. सासष्‍टीतील सहा आणि कुठ्ठाळी अशा एकूण सात मतदारसंघांत अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्‍याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. तर, युतीतील मगो पक्षासाठी तीन जागा सोडण्‍यात आल्‍या आहेत.

गेल्‍या अनेक महिन्‍यांपासून जिल्‍हा पंचायत निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केली आहे. पक्षनिष्‍ठा, जनसंपर्क आणि जिंकण्‍याची क्षमता लक्षात घेऊन ५० पैकी ४० मतदारसंघांत आम्‍ही उमेदवार दिलेले आहेत.

सासष्‍टीतील सहा आणि कुठ्ठाळी अशा सात मतदारसंघांत अपक्षांना पाठिंबा देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. भाजपने जे ४० उमेदवार दिलेले आहेत, त्‍यातील ८० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नवे चेहरे आहेत, असे प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indigo Flight Status: असुविधा के लिए खेद है! इंडिगोची विमानसेवा विस्कळीतच, गोव्यात 11 उड्डाणे रद्द, कंपनीने मागितली माफी

Goa Politics: खरी कुजबुज; मनोजचा ‘सोशल’ संताप

Super Cup 2025: गतविजेत्या FC गोवाची सुपर कपमध्ये मुसंडी! मुंबई सिटीला नमविले, अंतिम फेरीत पडणार ईस्ट बंगालशी गाठ

Goa Tourism: इस्रायली पर्यटकांसाठी 'गोवा' सर्वाधिक लोकप्रिय! वाणिज्य दूत हॉफमन यांची स्तुतीसुमने; थेट विमानसेवेबाबत मंत्री खंवटेंशी चर्चा

Goa Politics: गोवा भाजपला हवेत ‘होय बा’! बाबूंचा घरचा आहेर; तोरसेतून केली कांबळींची उमेदवारी जाहीर

SCROLL FOR NEXT