Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: जाहीर सभेसाठी आम्हाला सरकारने जागा नाकारली, खासगी जागेवर सभेचे आयोजन करावं लागलं; चोडणकरांचा आरोप

Girish Chodankar Government Land Allegation: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे १७ रोजी गोवा दौऱ्यावर येत आहेत, परंतु त्यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही जाहीर सभांचे आयोजन केले होते.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे १७ रोजी गोवा दौऱ्यावर येत आहेत, परंतु त्यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही जाहीर सभांचे आयोजन केले होते. त्यासाठी ज्या सरकारी जागा आम्ही मागितल्या, त्या जागा आम्हाला नाकारण्यात आल्या. त्यामुळे आम्हाला खासगी जागेवर सभेचे आयोजन करावे लागले असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

चोडणकर म्हणाले, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे हे गोव्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत. त्यानुसार प्रदेश काँग्रेसतर्फे नियोजन केले होते. आम्ही सुरुवातीला त्यांच्या सभेसाठी मडगावातील एसजीपीडीए मैदान मागितले ते आम्हाला नाकारण्यात आले.

त्यानंतर आम्ही पणजी महानगरपालिकेकडे आझाद मैदान मागितले, त्यांनी आम्हाला उद्या या आणि पैसे भरा असे सांगितले. त्यानंतर भाजपकडून आझाद मैदान आरक्षित केले गेले.

ताळगाव कम्युनिटी हॉल आणि सांताक्रूझ येथील श्यामाप्रसाद स्टेडियम ही ठिकाणेही सभेसाठी घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तेथेही आम्हा ला नाकारण्यात आल्याचा आरोप चोडणकर यांनी केला.

अशी परवानगी मागितली नाही: तवडकर

क्रीडा आणि युवा व्यवहारमंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले की, गोवा प्रदेश काँग्रेसने क्रीडा आणि युवा व्यवहार खात्याकडे सभेसाठी मैदान किंवा स्टेडियमची मागणी केलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT