Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

Crocodile Enters House In Khandepar: गोव्यातील खांडेपार परिसरात एका घरात मगर शिरल्याने मोठी खळबळ उडाली. घरात मगर आल्याचे लक्षात येताच कुटुंबातील सदस्यांची चांगलीच धावपळ उडाली.
Crocodile Enters House In Khandepar
Crocodile Dainik Gomantak
Published on
Updated on

Crocodile Enters House In Khandepar: खांडेपार परिसरात एका घरात मगर शिरल्याने एकच खळबळ उडाली. घरात मगर आल्याचे लक्षात येताच कुटुंबातील सदस्यांची भांबेरी उडाली. अचानक घरात आलेल्या या अनपेक्षित पाहुण्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. तर कुटुंबीयांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनीही घटनास्थळी गर्दी केली. घरात मगर शिरल्याची बातमी परिसरात पसरताच नागरिकांमध्येही उत्सुकता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच मगरीला घरातून बाहेर काढण्यासाठी संबंधित यंत्रणेला तात्काळ कळवण्यात आले. प्रशिक्षित पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मगरीला पकडण्यासाठी बचावकार्य सुरु करण्यात आले.

Crocodile Enters House In Khandepar
Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

मगरीची अखेर सुरक्षित सुटका

अथक प्रयत्नांनंतर घरात शिरलेल्या मगरीला सुरक्षितरित्या पकडण्यात यश आले. बचाव पथकाने काळजीपूर्वक मगरीला ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती आहे. मगरीची सुरक्षित सुटका झाल्याने घरातील सदस्यांसह परिसरातील नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.

Crocodile Enters House In Khandepar
Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

पावसाळ्यात (Rain) जलाशयांमधील पाण्याची पातळी वाढल्याने वन्यजीव मानवी वस्तीकडे येण्याच्या घटना वाढतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com