Girish Chodankar on Rohan Khaunte: Dainik Gomantak
गोवा

Girish Chodankar: मंत्री रोहन खंवटेंमुळे पर्वरीत जंगलराज! पर्वरी 'क्राईम कॅपिटल' बनली; न्यायाधीश, वकीलांमध्ये भीती

काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांचा आरोप, सतत हायकोर्टात जावे लागत असेल तर सरकारची गरजच काय?

Akshay Nirmale

Girish Chodankar on Rohan Khaunte: पर्वरीचे आमदार आणि मंत्री रोहन खंवटे यांनी पर्वरीला क्राईम कॅपिटल बनवले आहे, अशी टीका काँग्रेस नेते गिरिश चोडणकर यांनी केली. पर्वरीच्या जनतेने रोहन खंवटेंना आमदार केले ही त्यांची चूक आहे का?, असा सवालही त्यांनी केला. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

चोडणकर म्हणाले की, पर्वरीत जंगलराज झाले आहे. तिथे कायदा आणि सुव्यवस्था नाही. रोहन खंवटे म्हणतात तोच कायदा आणि तीच सुव्यवस्था अशी परिस्थिती येथे आहे. रोहन खंवटे ज्याला गुन्हेगार म्हणतील तोच गुन्हेगार अशी स्थिती पर्वरीत आहे. पर्वरीच्या पोलिस अधिकाऱ्याचा ऑडिओ व्हायरल झाला आहे.

पर्वरीतील एक प्रकरण मुंबई हायकोर्टात सुरू आहे. वरिष्ठ वकील सुरेंद्र देसाई यांनी कोर्टात याबाबत धक्कादायक वक्तव्य केले आहे. पर्वरीत न्यायाधीश आणि वकील देखील सेफ नाहीत. जर पर्वरीतील एखादी केस हातात घेतली आणि त्यात जर पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांचा इंटरेस्ट असेल, तर ते त्रास देतात.

कोर्टात येऊन ते वकिलांशी भांडतात. न्यायाधीश देखील घाबरतात. खंवटे हे मंत्री आहेत. त्यांच्या इच्छेविरूद्ध काही झाले असेल तर ते कोर्टात येऊन वकिलांशी भांडतात. न्यायाधीशांमध्येही भयाचे वातावरण आहे.

ते म्हणाले, पंचायतीचे सचिव, पोलिस अधिकारीच चुकीची तक्रार दाखल करून त्रास देत असल्याचे समोर आले आहे. या सगळ्या घटना पर्वरीतच का घडताहेत? रोहन खंवटे यांनी पर्वरीसारख्या एकेकाळी शांत असलेल्या ठिकाणाला क्राईम कॅपिटल बनवली आहे.

जेव्हापासून रोहन खंवटे पर्वरीचे प्रतिनिधित्व करत आहेत तेव्हापासून पर्वरी अशांत झाली आहे. कुणी जमिन हडपल्याची तक्रार केली तर तक्रारदारांवरच हल्ला केल्याच्या घटना घडताहेत. त्यालाच मारहाण करून त्याच्याविरोधातच तक्रार केल्या जात आहेत.

लोकांनी न्यायासाठी कुणाकडे जायचे? प्रत्येक प्रकरण घेऊन हायकोर्टातच जायचे असेल तर पोलिस, स्थानिक आमदार, गृहमंत्री, मुख्यमंत्री यांची गरजच काय?

ते म्हणाले, गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था गेल्या काही काळात खूप बिघडली आहे. गोव्याच्या गृहमंत्र्यांनी त्याकडे लक्ष दिले पाहिजे. राज्यात खून, बलात्कार होत आहेत. त्यावर नियंत्रण राहिलेले नाही.

एखाद्या मतदारसंघातील आमदार कायद्यापेक्षा मोठे झाल्यासारखी परिस्थिती आहे. कायद्याचे पालन करण्याबाबत केवळ सर्वसामान्यांनाच सक्ती केली जाते. पोलिसांनी अवैध गोष्टींना विरोध केला पाहिजे. पण, पोलिसांकडूनच कायदे मोडण्याचे काम होत आहे. त्यांना मुख्यमंत्र्यांचे संरक्षण मिळणे ही चिंतेची बाब आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT