Chirag Naik Protest Dainik Gomantak
गोवा

Chirag Naik Protest: चिराग नायक यांच्‍या आंदोलनास पाठिंबा! प्रशासनाकडून आडकाठी; प्रस्‍तावित इमारतीला विरोध

Chirag Naik Protest Margao: युवा उद्योजक तथा काँग्रेस नेते चिराग नायक हे मडगाव नगरपालिका बागेतील प्रस्तावित इमारतीच्या विरोधात शुक्रवारी सकाळपासून उपोषणाला बसले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: युवा उद्योजक तथा काँग्रेस नेते चिराग नायक हे मडगाव नगरपालिका बागेतील प्रस्तावित इमारतीच्या विरोधात शुक्रवारी सकाळपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांच्‍या आंदोलनाला गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेसचा अल्पसंख्याक विभाग तसेच स्थानिकांनी पाठिंबा दर्शवला आहे.

सकाळी ८ वा. नायक उपोषणाला बसले. त्यांनी सांगितले की, आम्‍हास आंदोलन शांततेत करायचे आहे. प्रस्‍तावित इमारतीविरोधात मडगावकरांमध्ये जागृती करण्यासाठी व मडगावच्या पारंपरिक, ऐतिहासिक बागेच्या रक्षणासाठी हे आंदोलन आहे.

आराखड्याची फाईल ‘एसजीपीडीए’कडे

या जागेतील एकाही झाडाची फांदी छाटली जाणार नाही. आता बागेत जे बांधकाम आहे ते मोडकळीस आले आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा स्लॅब कोसळला होता, म्हणून या बांधकामाचे नूतनीकरण करण्याचा ठराव कौन्सिलच्या बैठकीत मंजूर करून घेतला. आता या आराखड्याची फाईल ‘एसजीपीडीए’कडे असल्याचे नगराध्यक्ष शिरोडकर यांनी स्पष्ट केले.

युरींसह अनेकांनी दिला पाठिंबा

अनेक नागरिकांनी येऊन चिराग नायक यांना आपला पाठिंबा दर्शवला. यात माजी नगराध्यक्षा डॉ. बबिता आंगले सरदेसाई, राजू प्रभुदेसाई, ॲण्ड्र्यू सिक्वेरा यांचा समावेश आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले की, चिराग नायक यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या सार्वजनिक जागेला हात लावू देणार नाही. या इमारतीमुळे बागेतील मोकळी जागा आणखी व्यापली जाईल.

पोलिसांकडून हटविण्‍याचा प्रयत्‍न

पोलिस व जिल्हाधिकारी कचेरीतील अधिकाऱ्यांनी नायक यांना तेथून हटवण्याचा प्रयत्न केला. बसण्यासाठी घातलेली चादर व गादीदेखील तिथून काढली. मागे लावलेला फलकही काढण्यास सांगितले. सरकार व मडगावच्या आमदाराची ही दादागिरी आहे व मडगावकर त्यांना या दादागिरीबद्दल योग्य तो धडा शिकवतील, असे नायक यांनी सांगितले.

दोन मजली इमारत नव्हे केवळ जुन्या बांधकामाचे नूतनीकरण

मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सायंकाळी पत्रकारांना बागेतील प्रकल्पाच्या आराखड्याचे सादरीकरण केले. या सादरीकरणाप्रमाणे इथे दोन मजली इमारत दाखवण्यात आलेली नाही.

तळमजल्यावर गणपती पूजनासाठी प्रशस्त जागा व स्टोअर रूम असेल. वरचा मजल्यावर छप्पर नसेल. तिथे केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी व आराम करण्यासाठी व्यवस्था करण्यात येईल.

जवळच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेले बांधकाम मोडून तिथे त्यांना जेवण घेण्यासाठी जागा राखीव ठेवण्यात येईल व त्यांच्यासाठी चेंजिंग रूमची व्यवस्था करण्यात येईल.

शिवाय परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येईल. त्यासाठी हा ३.९२ कोटी रुपये खर्च दाखवण्यात आला आहे. ‘जीएसआयडीसी’ने निविदा जाहीर करताना चुकून दोन मजली इमारत, असे म्हटले आहे.

पण, तिथे कोणत्याही परिस्थितीत इमारत किंवा रेस्टॉरंट सुरू करण्यात येणार नाही. या जागेचा दुरुपयोग होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

Goa Monsoon Preparations: डिचोली परिसरात मजुरांचा वाढलाय 'भाव'; पावसाळापूर्व कामांची गडबड, अवकाळी पावसामुळे कामात व्यत्यय

Goa Politics: फोंडा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार; भाटीकरांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर लक्ष, इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता

Goa Weather: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीची हजेरी, पण गर्मीतून अद्याप सुटका नाही

Goa Infrastructure: डांबरीकरण खोळंबले, बेंजो वाजवून निषेध; मिशन फॉर लोकलतर्फे आंदोलन, आमदार प्रवीण आर्लेकरांवर टीका

SCROLL FOR NEXT