Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : काँग्रेसला अंतर्गत बंडाळीचीच भीती ; कार्यकर्ते गोंधळलेले

गोमन्तक डिजिटल टीम

सुशांत कुंकळयेकर

Goa Congress :

मडगाव, मी सच्‍चा काँग्रेसमन आहे. मात्र, यावेळी माझ्‍यावर अन्‍याय झाल्‍यास मी ‘रिॲक्‍ट’ होऊ शकतो, असा इशारा काँग्रेसचे विद्यमान खासदार फ्रान्‍सिस सार्दिन यांनी चक्‍क एका पत्रकार परिषदेत दिला.

सार्दिन यांच्‍या या वक्‍तव्‍याची काँग्रेस वर्तुळात वेगवेगळ्‍या अंगाने चर्चा होत आहेत. सध्‍या लोकसभा निवडणूक उमेदवारी मिळविण्‍याच्‍या प्रयत्‍नात असलेल्‍या उमेदवारांना उमेदवारी नाकारल्‍यास त्‍यापैकी काहीजण एकतर बंडखोरी करतील किंवा आतून भाजप उमेदवाराला साहाय्‍य करतील, अशा आशयाची चर्चा सध्‍या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येच होऊ लागली आहे.

दक्षिण गोव्‍यातून काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी विद्यमान खासदार फ्रान्‍सिस सार्दिन यांच्‍यासह माजी प्रदेशाध्‍यक्ष

गिरीश चोडणकर आणि कॅप्‍टन विरियातो फर्नांडिस यांचा प्रयत्‍न चालू आहे. सार्दिन यांच्‍या नावाला काँग्रेसचे सहयोगी पक्ष असलेल्‍या गोवा फॉरवर्ड या पक्षासह अन्‍य सामाजिक स्‍तरावरील कार्यकर्त्यांकडून विरोध होत आहे, तर गिरीश चोडणकर यांना उमेदवारी देण्‍यास काँग्रेसचेच

काही पदाधिकारी विरोध करीत आहेत.

अशा परिस्‍थितीत यातील कुणा एकाला उमेदवारी मिळाल्‍यास बाकीचे दोन इच्‍छुक कसे वागतील याबद्दल सध्‍या तर्कवितर्क व्‍यक्‍त केले जात आहेत. त्यांची भूमिका काय असेल याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे.

एल्‍वीसना ‘आप’चा विरोध

दक्षिण गोव्‍यातून आपल्‍याला काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी आणखी एक उमेदवार इच्‍छुक होते ते म्‍हणजे, ‘आप’मधून काँग्रेसमध्‍ये आलेले एल्‍वीस गोम्‍स. मात्र, प्रदेेश काँग्रेस समितीने त्‍यांचे नाव पक्षश्रेष्‍ठींकडे पाठविलेच नाही.

एल्‍वीस यांच्‍या नावाला इंडिया आघाडीचा सहयोगी पक्ष असलेल्‍या ‘आप’नेही विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर आता गोम्‍स यांना उमेदवारी मिळण्‍याची शक्‍यता कमीच असून त्‍यांनी आता काँग्रेसच्‍या कारभाराबद्दल उघडपणे बाेलणे सुरू केले आहे.

यापूर्वीचा इतिहास :

एका ज्‍येष्‍ठ काँग्रेस कार्यकर्त्याने सांगितले की, उमेदवारी मिळाली नाही तर दुसऱ्याला कसे पाडावे याचे गणित काँग्रेसच्‍या पदाधिकाऱ्यांना पूर्णपणे ठाऊक असून यापूर्वीचा इतिहासही तेच सांगतो.

फ्रान्‍सिस सार्दिन यांना डावलून २०१४ च्‍या लोकसभा निवडणुकीत दक्षिणेतून काँग्रेसने आलेक्‍स रेजिनाल्‍ड लॉरेन्‍स यांना उमेदवारी दिली होती, त्‍यावेळी सार्दिन यांनी स्‍वत: बंडखोरी केली नसली तरी त्‍यांचे पुत्र शालोम सार्दिन यांनी त्‍यावेळी लोकसभा निवडणूक लढविली होती.

भाजपकडून दबाव आणण्‍याचा प्रयत्‍न

काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेला नाही. अशावेळी आम आदमी पक्षाने आपण इंडिया आघाडीचे घटक असल्‍याने प्रचार सुरू केला असून आघाडीच्‍या उमेदवाराला निवडून द्या, असा प्रचार ते करू लागले आहेत.

मात्र, ‘आप’ने या प्रचारापासून स्‍वत:ला बाजूला ठेवावे यासाठी भाजपकडून दबाव येत आहे, असा आरोप ‘आप’चे कार्यकारी अध्‍यक्ष जर्सन गाेम्‍स यांनी शुक्रवारी गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात बोलताना केला.

काल आम्‍ही तिळामळ, रिवण व सांगे या भागात प्रचार केला. त्‍यावेळी एका भाजप पदाधिकाऱ्याचा आम्‍हाला फोन आला. तुम्‍हाला उमेदवारी दिलेली नाही.

मग तुम्‍ही प्रचार कशाला करता. तुम्‍ही प्रचार केला तर आमची मते कमी होतील, असे सांगण्‍याचा त्‍या पदाधिकाऱ्याचा प्रयत्‍न हाेता. भाजपने ‘आप’चा धसका घेतला आहे हे त्‍यातून ध्‍वनित होते.

- जर्सन गाेम्‍स, ‘आप’चे कार्यकारी अध्‍यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

SCROLL FOR NEXT