Govind Gaude Dainik Gomantak
गोवा

Minister Govind Gaude: गावडेंविरुद्ध काँग्रेसची पोलिसांत लेखी तक्रार

Minister Govind Gaude: सभापती रमेश तवडकर यांनी मंत्र्यावर केलेला भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध करावा, अन्यथा त्यांनी आपले पद सोडावे.

दैनिक गोमन्तक

Minister Govind Gaude: सभापती रमेश तवडकर यांनी मंत्र्यावर केलेला भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध करावा, अन्यथा त्यांनी आपले पद सोडावे. मंत्री आणि सभापतींनी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचा सहारा घेतल्याने त्यांचाही यात सहभाग आहे का?

असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते विजय भिके यांनी केला आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने आज पणजी पोलिस स्थानकात मंत्री गोविंद गावडे यांच्याविरोधात लेखी तक्रार दिली. याप्रसंगी जॉन नाझारेथ, श्रीपाद धोंड, ॲड. जितेंद्र गावकर, प्रणव परब यांची उपस्थिती होती.

मंत्री गावडे यांनी एससी-एसटी आयोगाच्या चेअरमनविरुद्ध जी भाषा वापरली आहे, त्याविरोधात प्रदेश काँग्रेस समितीच्या आदिवासी काँग्रेसचे चेअरमन रामकृष्ण जल्मी यांनी ही तक्रार दिली आहे. या तक्रारीविषयी माहिती देताना जल्मी म्हणाले, मंत्री गावडे एससी-एसटी आयोगाच्या चेअरमनला धमकी देतात.

मंत्री गावडे आणि सभापती तवडकर हे आदिवासी समाजाचेच आहेत. चेअरमनला धमकी देणे, वाईट शब्द वापरणे योग्य नाही. मंत्री गावडे हे विविध भ्रष्टाचारात अडकले आहेत. गोव्यासाठी आणि समाजासाठी ही बाब लज्जास्पद असून सरकारने मंत्री गावडे यांना पदावरून हटवावे, अशी आमची मागणी आहे.

भिके म्हणाले, सभापतींनी अधिवेशनाच्या दिवशीच भ्रष्टाचाराचा विषय काढला आहे, त्यावरून हे सरकार भ्रष्टाचारात बुडालेले असल्याचा आमचा आरोप आहे, तो यावरून खरा ठरला आहे. विधानसभेच्या सभागृहात सभापती भ्रष्टाचाराची जाहीर वाच्यता करतात आणि प्रदेशाध्यक्ष तानावडे ही आमची पक्षाची अंतर्गत बाब असल्याचे सांगतात हे चुकीचे आहे.

मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक होऊन हा वाद मिटल्याचे सांगितले जाते, तो वाद कसा मिटविला? असा सवाल त्यांनी केला. केवळ आमदारांचा येथेच वाद झालेला नाही, दिल्लीच्या गोवा निवासातही आमदारांचे वाद झालेले आहेत आणि ते कशावरून हे सर्वांना माहीत आहे. अधिकारी, मंत्र्यांचे फोन रेकॉर्ड होतात कसे? आणि ते बाहेर येतात कसे, असा सवालही त्यांनी केला.

जेव्हा जेव्हा भाजप सरकार येते, तेव्हा भ्रष्टाचार हा ठरलेला आहे. त्यामुळे जनतेने त्याचा विचार करावा. त्याचबरोबर विधानसभेत या मंत्री व सभापतींवर कारवाई व्हायला हवी. लोकशाहीनुसार सभापती वागत नाही, विधानसभेचे कामकाज आपल्या मर्जीने चालवतात, असा आरोपही भिके यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT