PM Narendra Modi: शैक्षणिक, पर्यटन हबची ‘गॅरंटी’!

PM Narendra Modi: मडगावात पंतप्रधानांची ग्‍वाही : 1330 कोटींच्‍या पाच प्रकल्‍पांना चालना
PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

PM Narendra Modi: ‘विकसित भारत, विकसित गोवा - 2047 ’ यात्रेच्‍या निमित्ताने आज मडगावात आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या सभेला हजारोंच्‍या संख्‍येने जनसमुदाय उपस्‍थित होता. याच भारलेल्‍या वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाेव्‍याच्‍या विकासाची ‘गॅरंटी’ दिली.

भविष्‍यात गोवा शैक्षणिक व पर्यटन हब म्‍हणून ओळखला जाईल, असा विश्वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला. याचवेळी त्यांनी आभासी पद्धतीने 1330काेटींच्‍या पाच प्रकल्‍पांना चालना दिली. पंतप्रधान माेदी यांनी ओघवत्‍या शैलीत केलेल्‍या भाषणाने उपस्‍थितांची मने जिंकली.

मडगावच्‍या कदंब बसस्‍थानकावर आयोजित केलेल्‍या या सभेला 30 हजारांहून अधिक लोक उपस्‍थित होते. कुंकळ्‍ळी येथील एनआयटी प्रकल्‍प, दाेनापावला येथील राष्‍ट्रीय क्रीडा प्रशिक्षण केंद्र, काकोडा येथील कचरा व्‍यवस्‍थापन प्रकल्‍पाच्‍या उद्‍घाटनासह पणजी ते रेईश मागूश किल्‍ल्‍यादरम्‍यानचा महत्त्वाकांक्षी रोप-वे प्रकल्‍प आणि शेळपे-साळावली येथे 100 एमएलडी पाणी प्रक्रिया प्रकल्‍पाची पायाभरणी केली.

PM Narendra Modi
Minister Govind Gaude: गावडे - तवडकर वादाला ऑडिओ क्लिपची फोडणी

तसेच सरकारी खात्‍यात भरती करण्‍यात आलेल्‍या उमेदवारांना नियुक्तिपत्रे देण्‍यात आली. गोव्‍याला आंतरराष्‍ट्रीय स्‍वरूपाचे कन्‍व्‍हेंशन केंद्र म्हणून विकसित करण्‍याबरोबरच गोव्‍यातील इको पर्यटनाला चालना देऊन ग्रामीण अर्थव्‍यवस्‍थेला उत्तेजन देण्‍यात येणार असल्‍याचे मोदी यांनी सांगितले.

गोवा बनणार इको, कॉन्फरन्स टुरिझम

गोवा हे इको टुरिझम आणि कॉन्फरन्स टुरिझम सेंटर म्हणून विकसित केले जाईल. या सुंदर राज्यात अनेक परिषदा होणार आहेत, गोव्यात पर्यटन विकासासह रोजगाराच्या संधी निर्माण होतील. आमचे डबल इंजिन सरकारच गोव्याच्या विकासाला गती देईल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

गोवा ही संत, कलाकारांची भूमी!

गोवा ही संत आणि कलाकारांची भूमीही आहे. संत सोहिरोबानाथ आंबिये, आचार्य धर्मानंद कोसंबी, कृष्णभट बांदकर असे विद्वान, भारतरत्न लता मंगेशकर, सुरश्री केसरबाई केरकर असे कलाकार, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारखे शास्त्रज्ञ अशा अनेक दिगज्जांची ही पावन भूमी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

PM Narendra Modi
Street Shopping In Goa: गोव्यात या ठिकाणी करा स्ट्रीट शॉपिंग; जाणून घ्या ठिकाणे

मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे आभार

गोव्यात १३३० कोटींच्या प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि शिलान्यास केल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले. तसेच १९३० उमेदवारांना नियुक्तिपत्रे प्रदान केल्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

ठळक वैशिष्ट्ये

कोकणी भाषेतून भाषणाला सुरवात करून पंतप्रधानांनी गोवेकरांची मने जिंकली.

  • 1900 युवकांना सरकारी रोजगार पत्रे वितरित. यात गोवा पोलिसात भरती व स्वातंत्र्यसैनिकांच्या

  • 21कुटुंबीयांचा समावेश.

  • मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या स्वयंपूर्ण गोवा संकल्पनेचे पंतप्रधानांनी केले भरभरून कौतुक.

  • सभास्थळी अल्पसंख्याक नागरिकांचीही लक्षणीय उपस्थिती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com