Minister Govind Gaude: गावडे - तवडकर वादाला ऑडिओ क्लिपची फोडणी

Minister Govind Gaude: समाज माध्यमांवर पडसाद : गावडेंच्या राजीनाम्याची मागणी
Govind Gaude & Ramesh Tawadakar
Govind Gaude & Ramesh Tawadakar Dainik Gomantak

Minister Govind Gaude: मंत्री गोविंद गावडे आणि आदिवासी कल्याण संचालक दशरथ रेडकर यांच्यातील संभाषणाची ध्वनिफीत सार्वत्रिक झाल्यानंतर समाज माध्यमांवर त्याचे एकच पडसाद उमटू लागले आहेत.

या ध्वनिफितीतील आवाज हे गावडे व रेडकर यांचेच असल्याची पुष्टी नसली तरी त्यांच्या आवाजाशी मिळते जुळते असे हे आवाज असल्याने ते आवाज गावडे व रेडकर यांचे असल्याचे मानून अनेकांनी गावडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणे सुरू केले आहे.

भाजपच्या मंत्र्याने एका ज्येष्ठ अधिकाऱ्याला उद्देशून अर्वाच्य भाषा वापरून त्यांची खरी संस्कृती दाखवून दिली असल्याची टिप्पणीही काहींनी केली आहे. ‘कापून काढू’ असे वाक्य या ध्वनिफितीत असल्याने कॉंग्रेसने पणजी पोलिसात धाव घेऊन मंत्र्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.

Govind Gaude & Ramesh Tawadakar
Street Shopping In Goa: गोव्यात या ठिकाणी करा स्ट्रीट शॉपिंग; जाणून घ्या ठिकाणे

खोतिगावातील एका वाड्यावरील संस्थांना कार्यक्रम करण्यासाठी 26 लाख रुपयांचे विशेष अनुदान गावडे यांनी मंजूर केले. प्रत्यक्षात ते कार्यक्रम झालेच नाहीत असा आरोप विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी केला. यामुळे या वादाला तोंड फुटले.

गावडे यांनी चौकशी करा असे प्रत्युत्तर दिले. विधानसभा अधिवेशन काळात या वादाचा विरोधकांकडून फायदा घेतला जाऊ नये म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी या दोघांची बैठक घेतली.

वाद मिटला असे मुख्यमंत्री व तानावडे यांना काल वाटले होते. मात्र, त्या बैठकीत गावडे यांच्या सैल बोलण्याचा एक नमुना म्हणून एक ध्वनिफीत वाजवण्यात आली होती. ती ध्वनिफीत गोमन्तक टीव्हीच्या हाती लागताच ती वाजवण्यात आली. त्यामुळे राज्यभरातील जनतेला हा विषय पुरता समजला.

Govind Gaude & Ramesh Tawadakar
Goa Medical College: ब्रेन डेड रुग्णाच्या दानाने दोघांना नवसंजीवनी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com