Sadanand Shet Tanavade Dainik Gomantak
गोवा

'काँग्रेसचा आपल्या उमेदवारांवर विश्वास नाही'

असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले.

दैनिक गोमन्तक

पणजी: आगामी गोवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करत आहेत. मागील काळात या पक्षांतराचा सगळ्यात जास्त फटका कॉंग्रेस पक्षाला बसला होता. एक वेळ अशी आली होती की, गोवा कॉंग्रेसमध्ये फक्त 2 आमदार शिल्लक होते. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कॉंग्रेसने एक वेगळी शक्कल लढवली आणि सर्व उमेदवारांकडून पक्षांतर न करण्याचे वचन घेण्यात आले. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी निवडणुकीनंतर (Goa Assembly Elections 2022) पक्षांतर करणार नसल्याची शपथ देवी महालक्ष्मी आणि‌ बांबोळी येथील क्रॉससमोर घेतली. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी भाष्य केले. (Goa Politics: Congress does not trust its candidates Sadanand Shet Tanavade)

तानावडे म्हणाले, "काँग्रेसचा (Congress) आपल्या उमेदवारांवर विश्वास नसल्यामुळेच पक्षाने त्यांना धार्मिक स्थळांवर शपथ घेयला लावली. राजकीय पक्षाने असे कृत्य करू नये. याचा आम्ही निषेध करतो. आपल्याच उमेदवारांवर विश्वास नसल्याने कॉंग्रेस पक्ष हे करत आहे."

“कॉंग्रेसला माहिती आहे की 2022 च्या निवडणुकीत त्यांना बहुमत मिळू शकत नाही आणि भाजप निवडणूक जिंकेल. त्यामुळे आपले उमेदवार आपल्याला सोडून जातील, अशी भीती त्यांना वाटत आहे. ज्या पक्षाकडे बहुमत आहे त्याला कोणीही सोडणार नाही," असे तानावडे पुढे म्हणाले.

याचसंदर्भात गोवा कॉंग्रेस प्रभारी पी. चिदंबरम (P Chidambaram) यांनी आपले मत स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, "गोव्यात (Goa) इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक पक्षांतर झाले आहे. निवडणूक तोंडावर असतानाही राजकीय नेते पक्षांतर करत आहेत. त्यामुळे उमेदवारांनी घेतलेली शपथ आवश्यक होती. आम्हाला आशा आहे की गोव्यातील लोक काँग्रेसवर विश्वास ठेवतील."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT