Women Reservation Dainik Gomantak
गोवा

लोकसभेच्या जागा 25 वर्षांसाठी गोठवण्यात याव्यात; काँग्रेस कार्यकारिणीची मागणी! 543 जागांमधूनच महिलांना 33 टक्के आरक्षण द्या

Women Reservation: लोकसभेच्या विद्यमान ५४३ जागांमधूनच महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण देण्यात यावे.

गोमंतक ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: लोकसभेच्या विद्यमान ५४३ जागांमधूनच महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण देण्यात यावे. जागांचा हा आकडा पुढील २५ वर्षांसाठी गोठविण्यात यावा,’’ अशी आग्रही भूमिका प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने घेतली आहे.

पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आज चार तास चाललेल्या  बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.अरुणाचल प्रदेशातील चीनच्या आक्रमणाचा निषेध करताना मोदी  सरकारने अमेरिकेपाठोपाठ  चीनपुढेही शरणागती पत्करल्याची या टीका बैठकीत करण्यात आली.  ‘काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या राज्यांमध्ये शैक्षणिक आणि परीक्षा प्रणालीमध्ये आवश्यक असलेल्या सुधारणांचा अहवाल  एक महिन्याच्या आत पक्षाच्या अध्यक्षांना सादर करावा,’ असे निर्देशही देण्यात आले आहेत.

या कार्यसमितीच्या बैठकीमध्ये विद्यार्थी आणि तरुणांच्या समस्यांव्यतिरिक्त अयोध्येच्या राम मंदिरातील  दानचोरीच्या मुद्यावरही चर्चा झाली. याविरोधात  देशपातळीवर आंदोलन करण्याचे काँग्रेसने ठरविले आहे.  ‘‘दानचोरी  हा केवळ राम मंदिराचा मुद्दा नसून जनतेच्या भावनांचा विषय बनला आहे. गावोगावी आणि पंचायत पातळीवर यासाठी आंदोलन करण्यात येईल,’’ असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले.  आजच्या बैठकीला  काँग्रेसशासित राज्यांच्या  चार मुख्यमंत्र्यांसह ८८ पदाधिकारी आणि निमंत्रितही उपस्थित होते.

कार्यसमितीचे ठराव

राम मंदिरातील चोरीबाबत देशभर आंदोलन.

भाजपच्या ध्रुवीकरणाचा भांडाफोड करू.

विद्यार्थी, शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडणार.

काँग्रेसशासित राज्यांनी शिक्षण व्यवस्था बदलावी.

‘वंदे मातरम’चे केवळ दोन कडवीच मान्य.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT