Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

India Beats Pakistan 4-3 In Hockey: भारतीय पुरुष हॉकी संघाने अत्यंत रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा 4-3 असा पराभव करत एशियन गेम्सच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला.
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Asian Games Semifinal 2026Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

India Beats Pakistan 4-3 In Hockey: भारतीय पुरुष हॉकी संघाने अत्यंत रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा 4-3 असा पराभव करत एशियन गेम्सच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. या विजयासह भारताने सलग दुसऱ्यांदा किताबी सामन्यात आपले स्थान निश्चित केले. विशेष म्हणजे, भारताचे पुरुष आणि महिला दोन्ही संघ आता सुवर्णपदकाच्या लढतीत पोहोचले आहेत. या सामन्यात भारताने सुरुवातीला 3-0 अशी भक्कम आघाडी घेतली, परंतु पाकिस्तानने तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये जोरदार कमबॅक करत सामना बरोबरीत आणला.

अखेर, सामना संपायला 49 सेकंद बाकी असताना भारताच्या अभिषेकने शानदार गोल करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्याचा हा गोल निर्णायक ठरला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानवर दबाव निर्माण केला. कर्णधार हरमनप्रीत सिंगने पाचव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे सोने करत भारताचे खाते उघडले आणि 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

India Beats Pakistan 4-3 In Hockey
Asian Games 2026: ब्लॉकबस्टर फायनल होणार! श्रीलंकेला 124 धावांनी धूळ चारत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश, आता जेतेपदासाठी पाकिस्तानशी होणार 'कांटे की टक्कर'

यानंतर 13व्या मिनिटाला पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतने दुसरा गोल नोंदवत भारताची पकड मजबूत केली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये 23व्या मिनिटाला सुखजीत सिंगने आणखी एक उत्कृष्ट गोल करत स्कोर 3-0 केला. हाफ टाईमपर्यंत भारत 3-1 अशा आघाडीवर होता, कारण पाकिस्तानकडून 30व्या मिनिटाला अबू महमूदने पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल केला. हाफ टाईमपर्यंत भारताकडे (India) सामन्याची पूर्ण सूत्रे होती आणि दोन्ही संघांना अनेक पेनल्टी कॉर्नर मिळाले.

India Beats Pakistan 4-3 In Hockey
Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये चीनचा धुव्वा उडवत टीम इंडियानं रचला इतिहास; अटीतटीच्या सामन्यात मारली बाजी

पहिल्याार्धात पिछाडीवर पडल्यानंतर पाकिस्तानने तिसऱ्या क्वार्टरमध्ये खेळाचे चित्र बदलण्याचा प्रयत्न केला. 45व्या मिनिटाला हनन शाहिदने गोल करुन अंतर कमी केले. या क्वार्टरमध्ये भारताला एकही गोल करता आला नाही. त्यानंतर चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरच्या सुरुवातीला 49व्या मिनिटाला वाहिद राणाने गोल करत स्कोर 3-3 अशी बरोबरी आणला. सामना पेनल्टी शूटआउटच्या दिशेने चालला असताना आणि प्रेक्षकांची धडधड वाढली असताना, भारताच्या अभिषेकने शेवटच्या क्षणी अप्रतिम गोल केला आणि भारताला 4-3 अशी अजेय आघाडी मिळवून देत फायनलचे तिकीट कन्फर्म केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com