Goa congress Dainik Gomanatk
गोवा

Goa Accident: अपघातप्रश्‍नी उपाययोजनांकडे सरकारचे दुर्लक्ष: काँग्रेसची टीका

Goa Accident: राज्यात रस्ता अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या सोळा दिवसांत रस्ते अपघातात नऊजणांना आपला जीव गमवावा लागला आहे

दैनिक गोमन्तक

Goa Accident: राज्यात रस्ता अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या सोळा दिवसांत रस्ते अपघातात नऊजणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तरीही भाजप सरकारला कोणतीही उपाययोजना करण्यात अपयश आल्याची टीका अखिल भारतीय काँग्रेस समितीचे गोवा मीडिया प्रभारी हर्षद शर्मा यांनी केली.

काँग्रेस भवनात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके, वीरेंद्र शिरोडकर उपस्थित होते.

शर्मा म्हणाले, 2023 मध्ये सुमारे 532 जणांना रस्ता अपघातात जीव गमवावा लागला. गेल्या वर्षी 2800 हून अधिक अपघात झाले. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अपघात झाले. मात्र, भाजप सरकार कोणतेही उपाय योजू शकले नाही.

भिके म्हणाले, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो हे बेजबाबदार वक्तव्य करीत आहेत. महसुलाच्या नावाखाली वाहतूक खात्याकडून जनतेची लूट सुरू आहे.

अनेक ठिकाणी उभारलेले वाहतूक सिग्नल यंत्रणा काम करीत नसल्याचेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

Goa Politics: दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी पाटकर-पालेकरांची लागणार कसोटी‘अपघाताचे सरकारला गांभीर्य नाही’

वाहनधारकांकडून वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवले जात नाही आणि सरकार सुरक्षितता देण्यात अपयशी ठरले आहे. जुन्या मांडवी पुलावर झालेला अपघात, कारने धडक दिल्याने दुचाकीस्वार वाहनावरून उडून नदीत पडला, ही घटना सरकारने तातडीने हाताळायला हवी होती. मोटारसायकल स्वाराचा मृतदेह शोधण्यासाठी यंत्रणेला दोन दिवस लागले. पुलाच्या रेलिंगची उंची वाढवण्यातही सरकारला अपयश आल्याचे हर्षद शर्मा यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT