Goa congress Dainik Gomanatk
गोवा

Goa Congress: काँग्रेसचे ख्रिस्‍ती उमेदवारावर एकमत

Goa Congress: कॅ. विरियातो यांचे नाव आघाडीवर : दक्षिणेत सार्दिन, एल्विस यांच्‍या नावांचाही विचार

दैनिक गोमन्तक

Goa Congress:

दक्षिण गोव्‍यातून भाजपचा उमेदवार कोण, हे अद्याप नक्‍की झाले नसले, तरी काँग्रेस मात्र परंपरेनुसार यावेळीही दक्षिण गोव्‍यातून ख्रिस्‍ती उमेदवारच उभा करणार असल्‍याची माहिती पुढे आली आहे. सध्‍या गोवा भेटीवर आलेले काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनीही अशीच भूमिका घेतली आहे. त्‍यामुळे दक्षिण गोव्‍यातून हिंदू उमेदवार, हा विचार मागे पडला आहे.

मिळालेल्‍या माहितीनुसार, कॅ. विरियातो फर्नांडिस यांच्‍यासह विद्यमान खासदार फ्रान्‍सिस सार्दिन आणि एल्विस गोम्‍स ही तीन नावे दक्षिण गोव्‍यासाठी चर्चेत आहेत. ‍या निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या गोवा फॉरवर्ड पक्षाने फ्रान्‍सिस सार्दिन यांच्‍या नावाला विरोध दर्शविला आहे.

त्‍यामुळे विरियातो यांचे नाव पुढे आल्‍याची माहिती प्राप्‍त झाली आहे. विरियातो यांना उमेदवारी दिल्‍यास मुरगाव तालुका काँग्रेसच्‍या बाजूने झुकण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे.

दक्षिणेत कॉंग्रेस परंपरा जपणार

काँग्रेसच्‍या सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीप्रमाणे, माणिकराव ठाकरे यांनी गोव्‍यातील उमेदवारीविषयी वेगवेगळ्‍या घटकांशी बैठका घेऊन चर्चा केली. त्‍यावेळी दक्षिण गोव्‍यासाठी काँग्रेसने ख्रिस्‍ती उमेदवारालाच पसंती द्यावी, असा सूर व्यक्त झाल्‍याचे समजते. दक्षिण गोव्‍यातून हिंदू उमेदवार उभा केल्‍यास अल्‍पसंख्‍याक मतदारांमध्‍ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, असेही ठाकरे यांना काहीजणांनी सांगितले, अशी माहिती मिळाली आहे.

गिरीश चोडणकरांचे नाव पडले मागे

दक्षिण गोव्‍यातील अल्‍पसंख्‍याक समाज काँग्रेसबरोबरच असल्‍याने पक्षाला दक्षिण गोवा सर करायचा असेल तर हिंदू मतदारांवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. त्यासाठी यावेळी काँग्रेसने दक्षिण गोव्‍यातून हिंदू उमेदवार उभा करावा, अशी कल्‍पना पुढे आणली होती. त्‍

यामुळे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर यांचे नाव पुढे आले होते. मात्र, काँग्रेसने नेहमीची परंपरा पाळण्‍याचे नक्‍की केल्‍याने गिरीश चोडणकर यांचे नाव आपोआप मागे पडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय सौझांच्या दुर्मिळ कलाकृतीनं रचला जागतिक विक्रम; 1965 मध्ये साकारलेल्या 'हनुमान– द मंकी गॉड' चित्राला 15.60 कोटींची बोली

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालचा मुक्काम कारागृहातच! सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, अंतरिम जामिनाची फेटाळली मागणी

Cabinet Decisions: उज्ज्वला योजनेपासून 'संजीवनी' साखर कारखान्यापर्यंत; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय, CM सावंतांची माहिती

Military Plane Crash: लँडिंग स्ट्रिप नसताना पत्करला इमर्जन्सी लँडिंगचा धोका; भीषण विमान अपघातात 14 जणांचा जागीच मृत्यू VIDEO

Goa Water Storage: धरणे तुडुंब; साळावली-आमठाणे शंभर टक्के, बहुतांश धरणांत 90 टक्क्यांहून अधिक साठा; चापोलीत केवळ 74 टक्के

SCROLL FOR NEXT