Rohan Khaunte News

 

Dainik Gomantak

गोवा

खंवटे यांना दिलासा; खंडपीठाकडून तक्रार आणि आरोपपत्र रद्द

गोवा खंडपीठाने खंवटे यांच्याविरोधातील तक्रार व आरोपपत्र रद्दबातल ठरवण्याचा निवाडा दिला आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या खंवटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दैनिक गोमन्तक

Panjim: माजी अपक्ष आमदार रोहन खंवटे यांच्‍याविरोधात भाजपचे प्रवक्ते प्रेमानंद म्हांबरे यांनी धमकावल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. ही तक्रार व पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्राला खंवटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. त्यावर आज गोवा खंडपीठाने ही तक्रार व आरोपपत्र रद्दबातल ठरवण्याचा निवाडा दिला आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या खंवटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

याचिकादार खंवटे (Rohan Khaunte) यांच्याविरुद्ध पर्वरी (Porvorim) पोलिसांनी भादंसंच्या कलम 323 खाली गुन्हा दाखल केला आहे, तो अदखलपात्र आहे व त्या आरोपाखाली तपास करण्यास पोलिसांना न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय परवानगी नाही. त्यामुळे पोलिसांनी दाखल केलेला हा गुन्हा रद्दबातल ठरविण्यात येत आहे. त्याचबरोबर या गुन्ह्याच्या आधारे न्यायालयात (Court) दाखल केलेले आरोपपत्रही रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे या निवाड्यानुसार न्यायालयातील सुनावणी बंद करण्यात येत आहे. तपास अधिकारी कायदा कलम 323 नुसार पुढील कारवाई करू शकतात, असे निरीक्षण गोवा खंडपीठाने निवाड्यात केले आहे.

रोहन खंवटे यांच्याविरुद्ध म्हांबरे यांनी पत्रकार परिषदेत आरोप केले होते. पर्वरी सचिवालयात जात असताना त्यांची गाठ खंवटे यांच्याशी आवारात पडली. त्यावेळी खंवटे यांनी म्हांबरे यांना जाब विचारत त्यांचा हात पकडला होता. या घटनेप्रकरणी म्हांबरे यांनी खंवटे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पर्वरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्याला खंवटे यांनी आव्हान दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Sadetod Nayak: डाग नसलेले उमेदवार काँग्रेसने देणे गरजेचे, त्यांनी विश्वासार्हता गमावली; भाजप निश्चितपणे पुन्हा जिंकेल

ओळखणंही झालं कठीण! WWE दिग्गज John Cenaचा धक्कादायक लूक; फोटो पाहून चाहतेही अवाक्!

Ardh Kendra Yog 2026: बँक बॅलन्स वाढणार, सगळ्या चिंता मिटणार! 'अर्धकेंद्र योग' बदलणार 5 राशींचे भाग्य; धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT