'त्या' पीडित महिलेची न्यायाधीशांसमोर जबानी

पर्यटक महिलेवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी राज्‍यात सर्वत्र संताप व्‍यक्त करण्‍यात येत आहे. त्‍या 35 वर्षीय पीडित महिलेची न्यायाधीशांसमोर जबानी नोंद केली जाणार आहे.
Victim

Victim

Dainik Gomantak

Published on
Updated on

पणजी/शिवोली : शिवोली येथील बहुचर्चित ‘तलाशा’ बार अॅण्‍ड रेस्टॉरंटच्या प्रसाधनगृहात पर्यटक महिलेवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी राज्‍यात सर्वत्र संताप व्‍यक्त करण्‍यात येत आहे. त्‍या 35 वर्षीय पीडित महिलेची न्यायाधीशांसमोर जबानी नोंद केली जाणार आहे. पीडित महिला तसेच अटक केलेल्या दोघा संशयितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून महिलेला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्‍याची माहिती महिला पोलिस स्थानक अधिकाऱ्यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या लैंगिक अत्याचारप्रकरणी ‘तलाशा’ बार ॲण्‍ड रेस्टॉरंटचे वेटर राकेश थापा व मुस्कान प्रधान यांना न्यायालयाने (Court) सात दिवसांची पोलिस (Police) कोठडी ठोठावली आहे. हे दोघेही नेपाळी असून त्‍यांच्‍याविरोधात भारतीय दंड संहितेच्या 375, 376 (ड) तसेच 354 आणि 328 या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (18 डिसेंबर) मध्यरात्री रेस्टॉरंटच्या आवारात घडली. पीडित महिला पंजाबी असून ती मॉडेल असल्‍याचे समजते. 19 डिसेंबरला संध्याकाळी एनजीओंच्या (NGO) मदतीने पणजी महिला पोलिस स्थानकात तक्रार नोंदविली. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. रेस्टॉरंट मालकाची तसेच तेथील काही कर्मचाऱ्यांची जबानी नोंदविण्याचे काम सुरू आहे. महिलेसोबत रेस्टॉरंटमध्ये गेलेल्या तिच्या मित्र-मैत्रिणींचीही जबानी नोंदवण्यात येणार आहे.

पीडित महिला आपले मित्र व मैत्रिणींबरोबर गोव्यात सुट्टीवर आली होती. शनिवारी रात्री शिवोली येथील ‘तलाशा’ बार व रेस्टॉरंटमध्ये ते गेले होते. हे सर्वजण एकत्र बसले असता पीडित महिला ते बसलेल्या जागेपासून मोकळ्या आवारातील एका ठिकाणी गेली. ही जागा काहीशी अडगळीची होती. ती मद्यधुंद स्थितीत असल्याने वरील दोघा वेटरनी गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने तिला अंधारात नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार (Assult) केला. खूप वेळ झाला तरी महिला न परतल्याने मित्र-मैत्रिणींनी शोध घेतला असता ती घाबरलेल्या स्थितीत आढळून आली. विचारणा केली असता दोन युवकांनी आपल्‍यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तिने सांगितले व ते टेबलावर त्यांना मद्य व खाद्यपदार्थ देणारे वेटर असल्याचे स्‍पष्‍ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com