Carlos Ferreira Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: धार्मिक भावना भडकावणाऱ्या घटना घडत आहेत ही दुःखद बाब! म्हापसा 'बीफ' प्रकरणावरती फेरेरांनी वेधले लक्ष

Goa Assembly Budget Session: पोलिसांनी खोटा पंचनामा तयार करण्यात आला, या सर्व प्रकरणातून धार्मिक सलोखा बिघडवण्याचा हा प्रयत्न होतो, असे आमदार कार्लुस फेरेरा यांनी सांगितले.

Sameer Panditrao

पणजी: सामाजिक आणि धार्मिक भावना भडकावणाऱ्या घटना राज्यात घडत आहेत, ही दुःखद बाब आहे. म्हापसा पोलिस स्थानकात दाखल झालेल्या तक्रारीनुसार पोलिस एका कुटुंबाला अटक करते व त्या कुटुंबाच्या घरात मध्यरात्री जाऊन बीफ असल्याची तपासणी केली जाते.

एफडीएनुसार तेथे बीफ नव्हते आणि तसे कोणतेही पदार्थ नव्हते, असे आढळून आले आहे. त्यामुळे पोलिसांकडे कोणत्याही प्रकारचे वॉरंट नसताना ते कसे काय कारवाई करू शकतात? उपनिरीक्षकाने कसे तेथे बीफ असल्याचे पंचनाम्यात म्हटले, त्यांनी त्याची चव चाखली होती काय, पोलिसांनी खोटा पंचनामा तयार करण्यात आला. या सर्व प्रकरणातून धार्मिक सलोखा बिघडवण्याचा हा प्रयत्न होतो, असे आमदार कार्लुस फेरेरा यांनी सांगितले.

राज्यपालांच्या भाषणावर ते पुढे म्हणाले, धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्या घटना घडत आहेत, ही चिंतेची बाब आहे. म्हापशातील प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयित असल्याचे स्पष्ट होते, असेही त्यांनी नमूद केले.

राज्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलकांवर हल्ले होत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पेडणेतील अबकारी खात्याविषयी आपण तारांकित प्रश्न विचारला होता, तरीही आपणास उत्तर देण्यात आले त्यात म्हटले की, परवाना नूतनीकरणासाठी २७.७८ लाख रुपयांचा अपहार झाला आहे. त्यात एक यूडीसी आणि दोन निरीक्षकांना निलंबित केले आहे. दक्षता आयोगाच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभाग या प्रकरणाचा तपास करीत असल्याचे म्हटले आहे, यावरून राजकीय दबावाचा वापर की काही घेवाण-देवाण झाली आहे, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी सभागृहास लक्षात आणून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cuncolim: सफर गोव्याची! गोवा मुक्ती लढ्याची‌ ठिणगी पडलेले, 12 बांधाच्या पाण्याने समृद्ध असलेले 'कुंकळ्ळी'

T20 World Cup 2026: बीसीसीआयचा 'स्ट्रिक्ट' मोड! मिशन वर्ल्ड कपसाठी 'होम मिनिस्टर'ची साथ सुटली; नियमावर बोट ठेवत खेळाडूंना ठणकावलं

Grah Gochar 2026: 120 वर्षांनंतर घडणार मोठा चमत्कार! शुक्र-सूर्य-शनीच्या त्रिनेत्र युतीनं 'या' 5 राशींवर होणार पैशांचा पाऊस

Bison In Goa: ब्रह्मकरमळीत गवा रेड्यांचा धुमाकूळ; दगडी कुंपण तोडून कळपाचा शिरकाव; शेतकरी चिंतेत

Salman Khan: "सलमान आणि मी एकत्र नग्न होऊन आंघोळ केलीय पण...", भाईजानच्या खास फ्रेंडने केला धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT