Gas cylinder shortage goa Dainik Gomantak
गोवा

LPG Gas Cylinder: आखाती युद्धाच्या झळा पणजीपर्यंत! गॅसअभावी हॉटेल्स बंद; सिलिंडरअभावी हॉटेल व्यावसायिक अडचणीत

Gas cylinder shortage goa: सध्या साठाच उपलब्ध नसल्याने व्यावसायिक सिलिंडर देणे कठीण होत असल्याचे हिंदुस्थान पेट्रोलियमचे वितरण अधिकारी दीपक शहा यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून राज्यात अद्यापही व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत झालेला नाही. याचा थेट परिणाम हॉटेल व्यवसायावर होत आहे. येथील सांतिनेज परिसरातील दोन लहान हॉटेल्‍स सोमवारी बंद असल्‍याचे दिसून आले.

आखातातील युद्धामुळे देशभर गॅस सिलिंडर पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्याचा फटका गोव्‍यालाही बसत आहे. राज्यातील प्रमुख वितरकांकडून व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा नियमित होत नसल्याने हॉटेलमालक अडचणीत सापडले आहेत.

सध्या साठाच उपलब्ध नसल्याने व्यावसायिक सिलिंडर देणे कठीण होत असल्याचे हिंदुस्थान पेट्रोलियमचे वितरण अधिकारी दीपक शहा यांनी सांगितले.राजधानी पणजीतील बहुतांश हॉटेल व्यवसाय पूर्णपणे गॅस सिलिंडरवर अवलंबून आहे. काही हॉटेलमालकांनी गोवा नॅचरल गॅसचे कनेक्शन घेतले असल्याने त्यांचा व्यवसाय सुरळीत सुरू आहे.

दरम्यान, ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत राजधानीत रस्त्यांचे काम झाले असले तरी अनेक ठिकाणी गॅसवाहिन्या टाकण्यात आलेल्या नाहीत. गार्सिया उद्यान परिसरातील हॉटेल्‍सना गॅसवाहिनी नसल्याने ही सेवा घेता आलेली नाही.

सांतिनेजमधील ‘बोरकर कॅफे’ला काही दिवसांपासून गॅस सिलिंडर मिळत नव्हता. अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही सिलिंडर उपलब्ध न झाल्याने अखेर सोमवारी हे हॉटेल बंद ठेवावे लागले. शिवाय याच परिसरातील ‘नवदुर्गा’ हॉटेलही सोमवारी बंद होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT