Goa Power lines Dainik Gomantak
गोवा

राज्यातील मान्सूनपूर्व कामांना वीज विभागाकडून सुरुवात

राज्यातील वीज पुरवठ्यावर पावसाळ्यात सर्वाधिक परिणाम होत असल्याने यावर्षी वीज विभागाने मान्सूनपूर्व कामे लवकर सुरू केली आहेत.

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्याच्या मुख्य विद्युत अभियंता (CEE) यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील वीज पुरवठ्यावर पावसाळ्यात सर्वाधिक परिणाम होत असल्याने यावर्षी वीज विभागाने मान्सूनपूर्व कामे लवकर सुरू केली आहेत.

दरम्यान, गोवा वीज विभाग (Goa Electricity Department) सीईई, स्टीफन फर्नांडिस यांनी शुक्रवारी सांगितले की, राज्यात सध्या मान्सूनची पूर्व तयारी सुरू आहे. ते पुढे म्हणाले की, " वीज विभाग मान्सूनपूर्व देखभालीच्या कामात आहे. तसेच जानेवारीच्या सुरुवातीला काम सुरू झाले असुन. कर्मचारी ट्रान्सफॉर्मरची देखभाल करत आहेत, कर्मचारी वर्ग प्रत्येक सबस्टेशनमध्ये देखभाल करण्यात व्यस्त आहेत. राज्यात पावसाळी वातावरणात वीजेची समस्या वाढते, विजेच्या उच्च दाबामुळे अनेकांची विजेची उपकरणे निकामी होत असतात याचमुळे वीज विभागाने मान्सूनपूर्व देखभालीच्या कामाला सुरवात केली आहे.

वीजेमुळे शॉर्टसर्किट होऊन संपूर्ण घराला आग लागली

मुरगाव सडा येथील विद्याधर रामा नागवेकर यांच्या घराला मंगळवारी मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र आगीत कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही. अग्निशमन दलाने घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मंगळवारी रात्री विजांच्या कडकडाटासह गोव्यात पाऊस (Rainfall) पडला. यामुळे संपूर्ण मुरगाव तालुक्यात विजेची समस्या निर्माण झाली होती. मंगळवारी मध्यरात्री दोन वाजता मुरगाव (Mormugao) सडा परिसरातील रहिवासी विद्याधर रामा नागवेकर यांच्या घरात वीजेमुळे शॉर्टसर्किट होऊन संपूर्ण घराला आग लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT