वाढीव पाणीबिलांवर तोडगा काढणार: नीलेश काब्राल

मुख्‍यमंत्र्यांशी लवकरच चर्चा: तूर्त लोकांनी अर्धी रक्कम तरी भरावी
Nilesh Cabral
Nilesh CabralDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: सध्‍या लोकांमध्ये पाण्याच्या वाढीव बिलांबाबत असंतोष असून आपल्याला जाणीव आहे. याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करुन तोडगा काढला जाईल, असे आश्र्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी प्रस्‍तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. एका कार्यक्रमानिमित्त मडगावात आले असताना त्‍यांच्‍याशी संवाद साधण्यात आला.

काब्राल म्‍हणाले की, लोकांनी पाण्याचा वापर जपून केला पाहिजे.. सरकारतर्फे लोकांना सध्‍या 16 हजार लिटर पाणी मोफत देण्यात येते. वीजदरांसाठी जो नवीन स्लॅब तयार करण्यात आला आहे, त्यावर पुनर्विचार केला जाईल. मात्र लोकांनी सध्‍या बिलाची अर्धी रक्कम तरी भरावी. पाणी दरात सुधारणा झाली तर व कमी रक्कम भरावी लागली तर ज्यादा भरलेल्या रकमेतून ती वजा केले जाईल. त्यामुळे लोकांनी चिंता करण्‍याचे कारण नाही.

Nilesh Cabral
Goa: भूखंडांना सुविधा पुरवून विक्री, हे वितरण नाही!

पश्‍चिम बगलरस्त्याबाबत तज्‍ज्ञ समिती घेणार निर्णय

पश्र्चिम बगलरस्त्याबाबत तज्‍ज्ञ समितीशी चर्चा करुनच निर्णय घेण्यात येईल, असे याबाबतच्‍या प्रश्र्नाला उत्तर देताना काब्राल यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी पश्‍चिम बगलरस्त्यासाठी जी तज्‍ज्ञ समिती नियुक्त केली होती, त्या समितीच्या आराखड्यानुसार हा रस्ता बनविण्यात येत आहे. त्यामुळे लोकांची मागणी असेल तर 2.75 किमी नव्हे तरी 1.20 किंवा 1.40 किंवा 1.50 किमीचा रस्ता स्टिल्टवर बांधता येईल. पण त्यासाठी तज्‍ज्ञ समितीचा सल्ला महत्वाचा आहे, असेही ते म्‍हणाले. सध्‍या जे मातीच्या भरावाचे काम सुरू आहे, ते तात्पुरते आहे. हा मातीचा भराव ‘अप्रोच रोड’साठी आहे. पावसाळ्यापूर्वी माती तेथून काढली जाईल, असे काब्राल यांनी सांगितले

Nilesh Cabral
पक्षश्रेष्ठींनी शब्द पाळला: सुदिन ढवळीकर

‘तम्‍नार’ प्रकल्‍पाबाबत निर्णय योग्‍यच

तम्‍नार प्रकल्पाबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे तो योग्यच आहे. आपण वीजमंत्री असताना जुन्या मार्गावरुनच वीजवाहिन्या नेणे योग्य ठरेल असे सुचवले होते. पण काही एनजीओ लोकांची दिशाभूल करत आहेत. उद्योगांनाही विजेची आवश्यकता आहे. त्यामुळे उद्योगांना सहकार्य करणे हे सरकारचे कर्तव्य आहे, असे ते म्‍हणाले.

मंत्रिमंडळ विस्‍ताराबाबत भाष्‍य करण्‍याचे टाळले

आज जो मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यासंदर्भात बोलताना मंत्री काब्राल म्हणाले की मंत्रिमंडळात कुणाला घ्यावे, कुणाला घेऊ नये हे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांचे आहेत. त्यावर आपण भाष्य करू शकत नाही. आम्हा मंत्र्यांचे काम मुख्‍यमंत्र्यांना, सरकारला सहकार्य करण्याचे व ते आम्ही चोख बजावू असे मंत्री काब्राल यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com