campal trade centre  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: चिखलीत एकमेकांवर सुरी हल्ला, दोघांनाही अटक

Goa Crime News: चिखली येथे शुल्लक कारणावरून एकमेकांवर सुरी हल्ला केल्याच्या आरोपाखाली कोलवाळ पोलिसांनी परस्परविरोधी गुन्ह्यांखाली संशयित आरोपींना अटक केली.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: चिखली येथे शुल्लक कारणावरून एकमेकांवर सुरी हल्ला केल्याच्या आरोपाखाली कोलवाळ पोलिसांनी परस्परविरोधी गुन्ह्यांखाली संशयित आरोपींना अटक केली. विश्वास गजानन पावसे (24, रा. रामनगर कोलवाळ) व साईश शिवाजी हिप्पालकर (31, रा. न्यू वाडो, चिखली) अशी संशयितांची नावे आहेत.

ही घटना शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास चिखली येथील दत्त मंदिराजवळ घडली. संशयित पावसे याने हिप्पालकर यास भिकारी म्हणून हिणवले आणि त्याच्या दुचाकीवर लाथ मारून त्याला खाली पाडले. त्यानंतर दोघांत हाणामारी झाली व त्यांनी एकमेकांवर सुरी हल्ला केला. यात हिप्पालकर याची छाती व पायावर सुरीचे घाव झाले.

तर पावसे याच्या छातीवर आणि उजव्या हातावर घाव झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रक्तबंबाळ अवस्थेतील दोन्ही जखमी संशयितांना म्हापसा इस्पितळात दाखल केले. संशयितांना शनिवारी डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हा नोंदवून अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT