Goa Crime News
Goa Crime NewsDainik Dainik Gomantak

Goa Crime News: काकीच्या खून प्रकरणी पुतण्याचा जामीन फेटाळला

Goa Crime News: साक्षीदारांवर दबाव शक्य: मडगाव न्यायालय
Published on

Goa Crime News: पाद्रीभाट नेसाय येथे मालमत्तेच्या वादातून काकीचा खून करण्यात आला. या प्रकरणी अटक केलेला संशयित मारियो ओलिव्हेरा हा साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता असल्याचे निरीक्षण नोंदवून मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

या प्रकरणी मायणा - कुडतरी पोलिसांनी 8 जानेवारी 2024 रोजी गुन्हा दाखल केला. त्यानुसार, पाद्रीभाट नेसाय येथे मालमत्तेच्या वादातून रविवार 7 जानेवारी रोजी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास संशयित मारियो आलिव्हेरा याने काकी फ्लोरेंटिना फर्नांडिस (५३) हिच्यावर चाकूने वार केला होता.

त्यानंतर तिला मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना तिचे निधन झाले. या प्रकरणी सरकारी वकील उत्कर्ष आवडे यांनी राज्याची बाजू मांडली.

या प्रकरणी मायणा - कुडतरी पोलिसांनी संशयित मारियो ओलिव्हेरा याच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला.

Goa Crime News
Film City In Goa: लोलयेत फिल्मसिटीचा मार्ग मोकळा

याच दरम्यान, घटनास्थळाहून पळ काढलेल्या संशयित मारिओला अटक केली. त्याला प्रथम 10 दिवस पोलिस कोठडी दिली. ती संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावली.ती संपल्यानंतर हजर केले.

ओळखीचे; संशयित दबाव टाकू शकतो !

सरकारी वकील उत्कर्ष आवडे यांनी संशयिताचा दावा फेटाळून लावत संशयित घटनास्थळाहून पळून गेला होता. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आले आहे.

याशिवाय तीन महत्त्वाचे साक्षीदार त्याच्या परिसरातील आणि ओळखीचे असल्याने साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता असल्याचा दावा करून त्याचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली. याची दखल घेऊन मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्या. शमा जोशी यांनी संशयित मारियो ओलिव्हेरा याचा जामीन फेटाळून लावला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com