Colvale Central Jail Dainik Gomantak
गोवा

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Colvale Central Jail Wine Allegations: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या आहारासाठी येणाऱ्या फळांचा वापर करून बेकायदेशीररीत्या वाईन (मद्य) तयार केली जात असल्याचा आणि कॅन्टीनच्या माध्यमातून अमलीपदार्थांचे रॅकेट चालविले जात असल्याचा दावा तसेच गंभीर आरोप एका तक्रारीद्वारे करण्यात आला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या आहारासाठी येणाऱ्या फळांचा वापर करून बेकायदेशीररीत्या वाईन (मद्य) तयार केली जात असल्याचा आणि कॅन्टीनच्या माध्यमातून अमलीपदार्थांचे रॅकेट चालविले जात असल्याचा दावा तसेच गंभीर आरोप एका तक्रारीद्वारे करण्यात आला आहे. मात्र, हे सर्व आरोप कारागृह प्रशासनाने ठामपणे फेटाळून लावले असून, हे दावे पूर्णपणे निराधार, हास्यास्पद व कारागृहाची सुरक्षा वाढवल्याने नाराज झालेल्यांचे षड्‌यंत्र असल्याचे स्पष्ट केले आहे.

सरकारी पातळीवर पाठवण्यात आलेल्या एका तक्रारीनुसार, कोलवाळ कारागृहातील कॅन्टीन हे अमलीपदार्थ, तंबाखू आणि महागड्या अनधिकृत अन्नाचे केंद्र बनल्याचा दावा करण्यात आला आहे. सरकारी खर्चाने कैद्यांना दिल्या जाणाऱ्या फळांचा अपहार करून त्यापासून कारागृहातच वाईन बनवली जात असल्याचा आरोप या तक्रारीत आहे. तसेच, कॅन्टीनच्या वस्तू चढ्या भावाने विकून ‘गुगल पे’ आणि कैद्यांच्या वैयक्तिक खात्यांतून दुहेरी वसुली केली जात असल्याचा आक्षेपही नोंदवला गेला आहे.

या आरोपांवर वरिष्ठ कारागृह पोलिस अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती मांडत सर्व दावे खोडून काढले आहेत. प्रशासनाने स्पष्ट केले की, वाईन निर्मितीसाठी विशिष्ट प्रक्रिया आणि प्रामुख्याने द्राक्षांची गरज असते. कारागृहात केवळ कलिंगड, केळी, सफरचंद आणि सुका मेवा उपलब्ध असतो. अशा फळांपासून मद्यनिर्मितीचा दावा निव्वळ काल्पनिक व अतार्किक आहे.

नियमांनुसार शासनाकडून केवळ ठरवून दिलेला अधिकृत आहार (अंडी आणि केळी) दिला जातो. कॅन्टीनमधून अतिरिक्त फळे किंवा साहित्य हवे असल्यास, त्याचा संपूर्ण खर्च कैद्यांच्या स्वतःच्या ‘पर्सनल प्रॉपर्टी’ (पीपी) खात्यातून रितसर कापला जातो. यासाठी सरकारी तिजोरीतील पैसा वापरला जात नाही. गेल्या काही महिन्यांत कारागृहात तपासणी कडक करण्यात आली असून कैद्यांच्या हालचालींवर निर्बंध आणले आहेत. यामुळे अस्वस्थ झालेल्या काही प्रवृत्तींकडून प्रशासनाची नाहक बदनामी करण्यासाठी खोटी माहिती पसरवली जात आहे.

कारागृहातील कारभारात पूर्ण पारदर्शकता असल्याचा पुनरुच्चार करत, गेल्या आठ महिन्यांतील सर्व फळांची खरेदी, वाटप आणि त्यावर घेतलेल्या कैद्यांच्या स्वाक्षऱ्यांचे संपूर्ण रेकॉर्ड तपासण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भातील सर्व पुराव्यांसह सविस्तर अहवाल लवकरच पोलिस महानिरीक्षकांना (आयजी) सादर केला जाणार आहे.

दरम्यान, कैद्यांना सकारात्मक प्रवाहात आणण्यासाठी कारागृहात कागदी पिशव्यांची निर्मिती, कार्यालयीन फाइल्स तयार करणे आणि गणेशोत्सवानिमित्त गणेशमूर्ती घडवण्याचे विविध उपक्रम सुरळीत सुरू असल्याचेही प्रशासनाने नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT