

चावडी: ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनासाठी राज्यातील २४ किनाऱ्यांना कासव विणीची स्थळे म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावात काणकोणमधील सहा समुद्रकिनाऱ्यांचा समावेश करण्याची शिफारस वन खात्याने पर्यावरण खात्याकडे केली आहे. हा प्रस्ताव १९ डिसेंबरपर्यंत मागे न घेतल्यास आमरण उपोषण करू, असा इशारा गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रवक्ते प्रशांत नाईक यांनी दिला.
गोवा फॉरवर्ड पक्षाच्या चावडी येथील कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे स्थानिक नेते उमेश तुबकी उपस्थित होते. जगातील सहाव्या क्रमांकाचा उत्कृष्ट समुद्रकिनारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाळोळे समुद्रकिनाऱ्याचाही या प्रस्तावात समावेश केला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास काणकोणच्या पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, असेही प्रशांत नाईक यांनी यावेळी सांगितले.
रोजगारावर संकट
काणकोण तालुक्यात पर्यटन व्यवसाय हा स्थानिकांच्या उपजीविकेचा महत्त्वाचा आधार बनला आहे. अनेक बेरोजगार युवक आपल्या कौशल्याच्या आणि क्षमतेच्या बळावर पर्यटनाशी संबंधित विविध व्यवसायांतून रोजगार मिळवत आहेत. अशा परिस्थितीत पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली स्थानिकांच्या रोजगारावर आणि आर्थिक उत्पन्नावर गदा येऊ नये याची सरकारने दक्षता घ्यावी, असे आवाहन नाईक यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.