Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Goa Monsoon Rainfall: राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असले, तरी सत्तरी तालुक्यावर पावसाची जोरदार कृपादृष्टी कायम आहे.
Goa monsoon rainfall update August 2026
Valpoi records 2552 mm rainfall while coastal Goa remains relatively dryDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असले, तरी सत्तरी तालुक्यावर पावसाची जोरदार कृपादृष्टी कायम आहे. वाळपईत आतापर्यंत तब्बल २,५५२ मिमी (१००.४७ इंच) पावसाची नोंद झाली असून, पावसाचे ‘शतक’ पूर्ण झाले आहे.

काणकोण, धारबांदोडा, केपे, सांगे आणि साखळी परिसरातही चांगला पाऊस होत आहे. मात्र, मुरगाव, दाबोळी आणि राजधानी पणजीत अद्याप ५० इंचांचाही टप्पा गाठलेला नाही. त्यामुळे किनारी भागातील नागरिकांना पावसाऐवजी कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे.

Goa monsoon rainfall update August 2026
Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

गेल्या २४ तासांत राज्यात सरासरी ७.९ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत राज्यात १,८०५ मिमी (७१ इंच) पाऊस झाला असून, ३० टक्के तूट कायम आहे. पुढील आठवड्यातही पाऊस कमी राहण्याची शक्यता असून तुरळक सरींचा अंदाज आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात चिंतेत टाकणाऱ्या धरणांच्या पाणीपातळीत आता समाधानकारक वाढ झाली आहे. सर्व धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला असून, अंजुणे धरणाची पातळीही वाढल्याने सोमवारी त्याचे दरवाजे उघडण्यात आले.

Goa monsoon rainfall update August 2026
Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com