Goa Cancer Research: कर्करोगाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी गोवा सरकारचा मोठा निर्णय; 'गोवा केअर्स'साठी 31 कर्मचाऱ्यांची भरती

Goa Cabinet Decisions: ‘गोवा केअर्स’ हा दहा वर्षांच्या कालावधीसाठी हाती घेण्यात आलेला दीर्घकालीन आरोग्य संशोधन प्रकल्प आहे.
Goa Cabinet Decisions
Goa Cancer ResearchDainik Gomamtak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोव्यात कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणामागील कारणांचा शोध घेण्यासाठी आणि या आजाराशी संबंधित विविध घटकांचा अभ्यास करण्यासाठी सुरू केलेल्या ‘गोवा केअर्स’ या महत्त्वाकांक्षी संशोधन उपक्रमासाठी ३१ कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली.

या कर्मचाऱ्यांची सुरुवातीला एक वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात येणार असून, गोवा मानव संसाधन विकास महामंडळामार्फत (जीएचआरडीसी) ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, या भरतीमध्ये एका वैद्यकीय कार्यक्रम समन्वयकासह चार संशोधन समन्वयक, १६ क्षेत्रिय कर्मचारी, चार प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक प्रशासक तथा लेखापाल आणि पाच बहुउद्देशीय कर्मचारी/माहिती नोंदणी परिचालकांचा समावेश आहे.

Goa Cabinet Decisions
Goa Assembly Session 2026: गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन केवळ एक दिवसाचे; 16 डिसेंबरची तारीख निश्चित, विरोधकांचा कालावधी वाढवण्याचा आग्रह

या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून संशोधन प्रकल्पासाठी आवश्यक असलेली क्षेत्रिय माहिती संकलन, आरोग्य तपासणी, प्रयोगशाळेतील कामकाज, प्रशासकीय व्यवस्था आणि माहितीचे संकलन व व्यवस्थापन करण्यात येणार आहे. ‘गोवा केअर्स’ हा दहा वर्षांच्या कालावधीसाठी हाती घेण्यात आलेला दीर्घकालीन आरोग्य संशोधन प्रकल्प आहे. गोवा आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई येथील टाटा मेमोरियल सेंटर आणि ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या सहकार्याने हा अभ्यास राबविण्यात येत आहे. या संशोधनांतर्गत राज्यातील २५ ते ७० वर्षे वयोगटातील सुमारे एक लाख प्रौढ नागरिकांचा समावेश करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करून पुढील दहा वर्षे त्यांच्या आरोग्यविषयक स्थितीचा मागोवा घेतला जाणार आहे.

या अभ्यासाचा मुख्य उद्देश कर्करोगासह विविध असंसर्गजन्य आजारांच्या निर्मितीमागील कारणांचा सखोल शोध घेणे हा आहे. त्यासाठी नागरिकांची जीवनशैली, आहाराच्या सवयी, पर्यावरणातील प्रदूषण आणि विविध घटकांचा संपर्क, आनुवंशिक वैशिष्ट्ये तसेच इतर आरोग्यविषयक बाबींचा अभ्यास केला जाणार आहे. या घटकांचा कर्करोग आणि अन्य असंसर्गजन्य आजारांशी नेमका कसा संबंध आहे, हे संशोधनातून समजून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

२४ किनाऱ्यांबाबत वन खात्याशी चर्चा

गोव्यातील २४ समुद्रकिनाऱ्यांना कासवांच्या अंडी घालण्याची ठिकाणे म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. या प्रस्तावामुळे स्थानिक व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वन खात्याशी चर्चा करून प्रस्तावाबाबत माहिती घेणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

तीन महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी

१. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गोव्याच्या ऐतिहासिक दस्तऐवजांचे जतन, हस्तलिखितांचे संवर्धन यांसह तीन महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

२. गोवा राज्य दृकश्राव्य संग्रहालय योजना (गोवा स्टेट ऑडिओ-व्हिज्युअल आर्काइव्हज स्कीम) मंत्रिमंडळाने मंजूर केली आहे. पुरातत्व खात्यामार्फत या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्यातील दृकश्राव्य स्वरूपातील ऐतिहासिक ठेवा जतन करण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.

Goa Cabinet Decisions
Human Trafficking In Goa: मुलाच्या वाढदिवसासाठी घेतले कर्ज, फेडण्यासाठी गोव्यात गेली; महिला मानवी तस्करांच्या जाळ्यात

३. गोवा राज्य हस्तलिखित मिशनसाठी स्वायत्त संस्था स्थापन करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या संस्थेसाठी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे अनुदान साहाय्याची पद्धतही मंजूर केली आहे. त्यामुळे हस्तलिखितांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या कामाला संस्थात्मक स्वरूप मिळणार आहे.

४. अभिलेख सर्वेक्षण योजना स्वीकारून तिची अंमलबजावणी करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. अभिलेख संचालनालयामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.