Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Girish Chodankar Petition: ‘गोवा काँग्रेस पक्ष’ या नवीन राजकीय पक्षाच्या प्रस्तावित नोंदणीबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई न केल्याने, त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी याचिका दाखल केली आहे.
 Girish Chodankar Petition
Goa CongressDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: ‘गोवा काँग्रेस पक्ष’ या नवीन राजकीय पक्षाच्या प्रस्तावित नोंदणीबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई न केल्याने, त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी याचिका दाखल केली आहे. साम्य असलेले नाव वापरल्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो, असा दावा करत त्यांनी नोंदणीला विरोध दर्शवला आहे.

‘काँग्रेस’ हा शब्द ऐतिहासिकदृष्ट्या आणि प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशीच जोडलेला आहे. गोव्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आपल्या ‘गोवा प्रदेश काँग्रेस समिती’ या राज्य घटकामार्फत कार्य करते. जनता आणि प्रसारमाध्यमांमध्ये ही शाखा ‘गोवा काँग्रेस’ याच नावाने ओळखली जाते. ‘गोवा काँग्रेस पक्ष’ हे नाव ‘गोवा काँग्रेस’ या प्रस्थापित ओळखीशी मिळतेजुळते आहे.

 Girish Chodankar Petition
Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

केवळ ‘पक्ष’ हा सामान्य शब्द जोडल्याने नवीन पक्षाचे वेगळेपण सिद्ध होत नाही. त्यामुळे हा पक्ष काँग्रेसचाच भाग किंवा अधिकृत शाखा आहे, असा गैरसमज मतदारांमध्ये पसरू शकतो, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांचे उल्लंघन

नवीन पक्षाचे नाव अस्तित्वात असलेल्या पक्षांपेक्षा ‘स्पष्टपणे वेगळे’ असले पाहिजे, जेणेकरून मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होणार नाही, अशी निवडणूक आयोगाची १९ मे २०१४ रोजीची मार्गदर्शक तत्त्वे आहेत. प्रस्तावित नावाची नोंदणी केल्यास या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

 Girish Chodankar Petition
Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

निवडणूक आयोगाने २ जुलै २०२६ रोजी सार्वजनिक नोटीस काढून ‘गोवा काँग्रेस पक्ष’ या नावाच्या नोंदणीबाबत हरकती मागवल्या होत्या. त्यानुसार चोडणकर यांनी ११ जुलै रोजी आक्षेप नोंदवला. त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी २७ जुलै रोजी आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय विधी विभागाने २ ऑगस्ट रोजी अतिरिक्त हरकती दाखल केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Congress Party Registration Case
Goa Congress Party Registration Dispute
Goa Politics
Congress Goa Assembly Election Alliance
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com