Crime|Arrest Canva
गोवा

Goa Crime: कोलवा पोलिसांची कारवाई! खंडणी-अपहरणप्रकरणी अटक, बंदुका जप्त

Colva Police: या प्रकरणी १३ ऑगस्ट रोजी रात्री कोलवा पोलिस स्टेशन गुन्हा नोंद केला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

फातोर्डा: कोलवा पोलिसांनी एका कारवाईत एका संशयित व्यक्तीकडून दोन बंदुका जप्त केल्या आणि बेताळभाटी येथील अल्पवयीन मुलाच्या खंडणी व अपहरणात सहभागी आरोपींला अटक केली. या प्रकरणी १३ ऑगस्ट रोजी रात्री कोलवा पोलिस स्टेशन गुन्हा नोंद केला आहे.

जुलिका फर्नांडिस ई टेलेस यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. गोवा चिल्ड्रेन ॲक्ट कलमाअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.बेतालभाटी येथे ८ ऑगस्ट रोजी हे प्रकरण मार्टिन्स कॉर्नर जवळ घडले होते.

संशयित आरोपी असलेल्या मार्कोस मेनिनो डिसोझा नावाच्या व्यक्तीने तक्रारदाराच्या घराचा दरवाजाला कडी लावली. तक्रारदार व तिच्या अल्पवयीन मुलाला त्यांच्या घरात डांबून ठेवले आणि त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली.

तक्रारदाराकडे सात लाख रुपयांची मागणी केली आणि तक्रारदार पैसे देण्यास गेले असता आरोपी व्यक्तीने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: बंगळूरमधून आले गोवा फिरायला, जंगलात केली प्रेयसीची हत्या; संशयिताविरुद्ध आरोप निश्चित

Goa Politics: खरी कुजबुज; विजय सरदेसाई, विश्वजीतमध्ये दुरावा?

Ranji Trophy 2025: गोव्याचा डाव गडगडला! 'अर्जुन तेंडुलकर' अपयशी; MPच्या सारांशचा प्रभावी मारा

Marina Project: वादग्रस्त ‘मरिना प्रकल्‍प’ नावशीतून मुरगाव बंदरात! पर्यटनाला देणार चालना; BOT तत्त्‍वावर उभारणी सुरू

Mulgao Mining Issue: '..तर जिल्हा पंचायत निवडणुकीवर बहिष्कार'! मुळगाववासीयांचा इशारा; खाणीच्या विळख्यातून मुक्त करण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT