Sexual Harassment Dainik Gomantak
गोवा

Sexual Harassment: 'इन्स्टाग्राम'वरून मैत्री करून युवतीला फसविणारा गजाआड, पोलिस कोठडीत रवानगी; तपास सुरू

Colva Police Arrest Rajendra Saini: इन्स्टाग्रामवरून एका युवतीशी मैत्री करून नंतर विवाहाचे वचन देऊन तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमाला कोलवा पोलिसांनी जेरबंद केले आहे.

Sameer Amunekar

मडगाव: इन्स्टाग्रामवरून एका युवतीशी मैत्री करून नंतर विवाहाचे वचन देऊन तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमाला कोलवा पोलिसांनी जेरबंद केले आहे. राजेंद्र सैनी (२८) असे संशयिताचे नाव असून, तो मूळ उत्तर प्रदेश राज्यातील मथुरा येथील आहे. अधिक तपासासाठी त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.

संशयिताविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ६९, ३१६ व ३१८ कलमाखाली गुन्हा दाखल केल्याची माहिती कोलवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांनी दिली. पोलिस साध्या संशयिताची कसून चौकशी करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने पीडितेशी इन्स्टाग्रामवरून मैत्री केली. त्यानंतर तिच्याशी लग्न करू, असे वचन दिले व विविध निमित्त पुढे करून पीडितेकडून चार लाख रुपये उकळले तसेच तिच्या आईची सोन्याची चेन व रिंगही घेतली.

यादरम्यान तिचे लैंगिक शोषणही केले. हे प्रकरण मागच्या वर्षी २८ ऑगस्टपासून यावर्षी ८ मेपर्यंत सुरू होते. शेवटी आपण फसविले गेले हे लक्षात आल्यानंतर, त्या युवतीने कोलवा पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी लागलीच तपासकाम सुरू करून संशयिताला कोलवा येथे पकडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT