Cricket Betting Goa: आसगाव येथे आयपीएलच्या सट्टेबाजीवर पोलिसांचा छापा, सातजणांना अटक; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

IPL Betting Raid Assagao: आसगाव येथे आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेकायदेशीररीत्या सट्टा लावणाऱ्या एका टोळीचा हणजूण पोलिसांनी पर्दाफाश केला.
Cricket Betting Goa
Cricket Betting GoaDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: आसगाव येथे आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेकायदेशीररीत्या सट्टा लावणाऱ्या एका टोळीचा हणजूण पोलिसांनी पर्दाफाश केला. ९ मे रोजी मध्यरात्री १२.१५ ते पहाटे ३.३० वा.च्या सुमारास आसगाव येथील रेसिडेन्सीमधील एका सदनिकेवर हा छापा टाकण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, आसगाव येथील एका फ्लॅटमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या आयपीएल सामन्यावर आणि इतर ऑनलाइन खेळांवर सट्टा लावला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

Cricket Betting Goa
Goa Unseasonal Rain: पावसामुळे गोमंतकीयांना किंचित दिलासा, राज्‍याच्‍या काही भागांत बरसला; तरीही उकाडा

या माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या कारवाईत निखिल जेठानंद पोपतानी (पुणे), विकी ब्रिजभम विश्वकर्मा (उल्हासनगर), कमलेश भवनदास भाखरू (वडोदरा), नवीन रतनलाल तलरेजा (उल्हासनगर), राहुल दिनेश शामदासानी (उल्हासनगर), रोहित महेशलाल कंजम (उल्हासनगर) आणि भरत धर्मेशभाई नामानी (वडोदरा) या सात संशयितांना रंगेहाथ पकडले.

या छाप्यात पोलिसांनी संशयितांकडून ८ मोबाईल फोन आणि एक टेलिव्हिजन संच, असा एकूण ६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. हे सर्व संशयित मोबाईलद्वारे ऑनलाइन जुगार आणि सट्टेबाजीच्या हालचाली करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

Cricket Betting Goa
Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

कारवाई यशस्वी

उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर, म्हापसा उपविभागीय पोलिस अधिकारी सलीम शेख आणि हणजूण पोलिस निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नितेश शिंगाडी, हवालदार शामसुंदर, पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश पोळेकर, गौरेश रेडकर, गुरुदास सांगेलकर आणि कल्पेश दाभोळकर यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास हणजूण पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com