Goa Unseasonal Rain: पावसामुळे गोमंतकीयांना किंचित दिलासा, राज्‍याच्‍या काही भागांत बरसला; तरीही उकाडा

Goa Weather Forecast IMD: गेल्‍या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्‍या गोमंतकीयांना शनिवारी किंचित दिलासा मिळाला.
Goa Unseasonal Rain
Goa Unseasonal RainDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गेल्‍या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्‍या गोमंतकीयांना शनिवारी किंचित दिलासा मिळाला. संध्‍याकाळच्‍या वेळी राज्‍याच्‍या काही भागांत गडगडाटासह पाऊस पडला.

राज्‍यात उकाडा प्रचंड वाढला आहे. त्‍यामुळे पावसाची शक्‍यता व्‍यक्त करण्‍यात येत होती. आज सकाळपासूनच वातावरण दमट होते.

संध्‍याकाळच्‍या सुमारास सांगे, केपे, मडगाव, धारबांदोडा, काणकोण, पेडणे, डिचोली, वाळपई, साखळी तसेच अन्‍य भागांत पावसाने हजेरी लावली. त्‍यामुळे काही ठिकाणी पडझड झाली तर ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाला. मात्र मोठे नुकसान झाल्‍याचे वृत्त नाही.

Goa Unseasonal Rain
Goa NCRB Crime Report: "नारी शक्ती वंदन" फक्त नावापुरतेच? एनसीआरबी अहवालावरुन काँग्रेसचा सावंत सरकारवर हल्लाबोल, गोव्यात सुशासनाचा दावा फोल

राजधानी पणजीतही संध्याकाळी साडेचारच्‍या सुमारास आकाशात ढग दाटून आले होते. परंतु पाऊस पडला नाही. दरम्‍यान, उद्या रविवारीही पावसाची शक्‍यता वर्तविली आहे.

Goa Unseasonal Rain
Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

वाढत्‍या तापमानामुळे आणखी उष्‍मा वाढणार

मागील चार दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांवर आहे. उद्या रविवारीही हीच स्‍थिती असेल. त्‍यामुळे मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवू शकतो. सोबतच संध्याकाळच्या सुमारास काही भागात तुरळक पाऊस देखील पडू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com