Education Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 1 सप्टेंबरपासून महाविद्यालयीन वर्ग सुरू; पण...

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील (Goa) ज्या महाविद्यालयांना (colleges) 1 सप्टेंबरपासून ऑफलाईन वर्ग (Offline Class) सुरू करणे शक्य आहे, त्यांनी ते वर्ग सुरू करावेत, अशी मुभा सरकारने (Goa Government) महाविद्यालयांना दिली आहे. उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर (Prasad Lolayekar Director of Higher Education) यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील महाविद्यालयांना सध्या सुटी आहे. युजीसी (UGC) नियमावलीनुसार 1 सप्टेंबरपासून महाविद्यालये सुरू होणार आहेत.

राज्यात कोरोना नियंत्रणात आलेला असल्याने ज्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलावून त्यांना प्रत्यक्ष शिक्षण देणे शक्य आहे त्यांनी तसे करावे. ज्यांना शक्य नाही त्यांनी ऑनलाईन वर्गाद्वारे शिक्षण सुरू ठेवावे, असे पर्याय सरकारने महाविद्यालयांना दिले आहेत. पण, सप्टेंबर सुरू होताच यात काही बदलही होऊ शकतात. त्या-त्या महाविद्यालयातील पायाभूत सुविधा पाहून त्या-त्या शिक्षण संस्थांनी निर्णय घेण्याची गरज असल्याचे लोलयेकर यांनी सांगितले. दुसरीकडे ज्या शिक्षकांनी अद्यापही संधी असतानाही कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही घेतलेले नाहीत त्यांना दर आठवड्याला कोरोना निगेटीव्ह प्रमाणपत्र आणून द्यावे लागणार आहे. एक डोस घेऊन ज्यांना 90 दिवस झालेत त्यांनी दुसरा डोस घ्यावा. नपेक्षा कोरोना नेगेटीव्ह प्रमाणपत्र आणावे लागेल, असा इशारा देण्यात आलेला आहे.

सरकार व उच्च शिक्षण खात्यात ताळमेळाचा अभाव

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी परवा व कालही सध्यातरी शाळा किवा महाविद्यालये सुरु करण्याबाबत विचार झालेला नाही, संचारबदी वाढवलेली आहे असे सांगितले होते. दुसरीकडे उच्च शिक्षण संचालनालयाने रात्री उशिरा ज्यांना शक्य आहे त्यांनी ऑफलाईन मोडवर शिक्षण सुरू करावे, अशी सुचना करणारे परिपत्रक काढले. या परिपत्रकात हे शिक्षण केव्हापासून सुरू करावे याबाबत तारीख टाकली गेली नव्हती. यावरुन सरकार व उच्च शिक्षण संचालनालय यांच्यात ताळमेळ नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT