

बार्देश: म्हापसा मासळी मार्केट आणि भाजी मार्केटच्या मधोमध असलेल्या सार्वजनिक पाण्याच्या विहिरीत मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या तसेच इतर कचरा टाकण्यात आल्यामुळे येथील पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून बाजारात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांसह ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दररोज शेकडो नागरिक भाजीपाला, मासळी खरेदीसाठी या बाजारात येत असतात. मात्र विहिरीत साचलेल्या कचऱ्यामुळे निर्माण झालेल्या अस्वच्छतेमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेषतः मासळी मार्केट परिसरात आधीच असलेल्या वासात या दूषित पाण्याच्या दुर्गंधीची भर पडत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. गोवा राज्य शिवसेना प्रमुख जितेश कामत यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
रोगराईची भीती
या विहिरीमध्ये घाण पसरली असून पाणी दुर्गंधीयुक्त झाले आहे. आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने या परिसरातील व्यापारी व ग्राहकांना डेंग्यू–मलेरियाचा धोका उद्भवण्याची शक्यता वाढली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.