Goa Bangladeshi Deportation: पर्यटन नगरीत घुसखोरांचा सुळसुळाट, 6 बांगलादेशींची हकालपट्टी; गोवा पोलिस 'ॲक्शन मोड'मध्ये

Goa Police Bangladeshi Deportation: कोणत्याही वैध प्रवास दस्तऐवजांशिवाय गोव्यात राहणाऱ्या सहा बांगलादेशी नागरिकांना प्रशासनाने कायदेशीर प्रक्रियेनंतर मायदेशी धाडले.
Goa Bangladeshi Deportation
Bangladeshi DeportationDainik Gomantak
Published on
Updated on

illegal Immigrants in Goa : अवैध स्थलांतर आणि इमिग्रेशन कायद्यांच्या उल्लंघनाविरुद्ध सुरु असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले. कोणत्याही वैध प्रवास दस्तऐवजांशिवाय गोव्यात राहणाऱ्या सहा बांगलादेशी नागरिकांना प्रशासनाने कायदेशीर प्रक्रियेनंतर मायदेशी धाडले. ही हकालपट्टी बुधवारी गोवा फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस (FRRO) आणि सीमा सुरक्षा दल (BSF) यांच्या संयुक्त समन्वयाने पार पडली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सहा जणांना एफआरआरओ गोव्याच्या एस्कॉर्ट टीमने बीएसएफकडे सुपूर्द केले, ज्यांनी त्यांना बांगलादेशला पाठवून दिले.

गोव्यात (Goa) गेल्या काही काळापासून अवैध स्थलांतरितांचा शोध घेण्याची प्रक्रिया वेगाने सुरु आहे. आकडेवारीनुसार, 2025 पासून आतापर्यंत गोवा पोलिसांच्या फॉरेनर्स शाखेने 35 बांगलादेशी नागरिकांचा मागोवा घेत त्यांच्या हकालपट्टीची प्रक्रिया पूर्ण केली. यामध्ये 9 पुरुष, 7 महिला आणि 19 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

Goa Bangladeshi Deportation
Goa Police Salary: '..त्यांच्यापेक्षा आम्हाला कमी पगार मिळतो'! गोव्यातील हेड कॉन्स्टेबल्सनी दाखल केली याचिका; खंडपीठाकडून नोटीस

गोवा पोलिसांनी (Goa Police) दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीर प्रवेश आणि व्हिसा संपल्यानंतरही अधिक काळ मुक्काम करणाऱ्यांविरुद्ध ही कारवाई एफआरआरओ आणि इतर संबंधित यंत्रणांच्या मदतीने सुरुच राहील. प्रशासनाने जनतेला आवाहन केले की, त्यांनी आपल्याकडे राहणाऱ्या भाडेकरुंच्या आणि कामावर असलेल्या कामगारांच्या कागदपत्रांची पडताळणी करावी आणि कोणत्याही संशयास्पद व्यक्तीची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा फॉरेनर्स शाखेला द्यावी.

Goa Bangladeshi Deportation
Goa Police Attack: बुरखाधारी गावगुंडांचा गोवा पोलिसांवर हल्ला! ‘म्हाेरक्या’ कोठडीत; 3 हल्लेखोरांच्या आवळल्या मुसक्या

अवैध स्थलांतरितांविरुद्धची ही मोहीम केवळ गोव्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्येही पोलिसांनी एक मोठी मोहीम राबवून सुमारे 2000 परदेशी नागरिकांची चौकशी केली. यामध्ये अनेक संशयित बांगलादेशी स्थलांतरितांना पडताळणीसाठी ताब्यात घेण्यात आले. यापूर्वी जानेवारी महिन्यातही बंगळुरुमध्ये इलेक्ट्रॉनिक सिटी आणि हेब्बागोडी परिसरातून 26 जणांना अटक करण्यात आली होती.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईतही बुधवारी घुसखोरीविरोधी मोठी कारवाई करण्यात आली. वर्सोवा पोलिसांनी या वर्षातील एका मोठ्या कारवाईत यारी रोड परिसरातून 25 बांगलादेशी नागरिकांना अटक केली. यामध्ये 21 तृतीयपंथीय, दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. हे सर्वजण वैध कागदपत्रांशिवाय शाकुलशहा दर्ग्या जवळ राहत असल्याचे आढळले.

Goa Bangladeshi Deportation
Goa Police: पोलिसांत अधीक्षकांची ‘भाऊगर्दी’! मंजूर पदांपेक्षा वाढल्या बढत्या; अतिरिक्त कार्यभार कमी करण्याचे कारण पुढे

मुंबई पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, 1 जानेवारी ते 20 फेब्रुवारी या कालावधीत शहरातून 113 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यापैकी 27 जणांची आतापर्यंत मायदेशी हकालपट्टी करण्यात आली आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये सुरु असलेल्या या धडक कारवाईमुळे अवैधपणे राहणाऱ्या घुसखोरांचे धाबे दणाणले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com